Drugs Caseराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीवर पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. नव्याने फर्जीवाडा समोर आणणार असं म्हणत मलिकांनी समीर वानखेडेंवर निशाणा साधला आहे. समीर वानखेडेंना त्याच पदावर कायम ठेवण्यासाठी दिल्लीतून एका बड्या भाजप नेत्याचं लॉबिंग सुरु असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.


मलिक म्हणाले, ''मागील काही दिवसांपासून समीर वानखेडे मी कार्यकाळ वाढवून मागत नाही. दोन महिन्यांच्या सुट्टीवर जाणार आहे. अशा बातम्या पेरल्या जात आहेत.'' कार्यकाळ संपल्यानंतरही अजूनही त्यांची बदली का करण्यात आली नाही? असा सवाल मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. 


आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. मलिकांनी म्हटलं की, ''मला आणि माझ्या कुटुंबाला घाबरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, आम्ही घाबरणाऱ्यांपैकी नाही. मागील वर्षी फर्जीवाडा समोर आणला तसा या वर्षीही समोर आणणार आहे.''


मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ''मागील काही काळापासून हजारो करोडो रुपयांची वसुली सुरू आहे. प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली होती त्याचं पुढे काय झाले. आमच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला. मी कोर्टाच्या आदेशानुसार सर्व पुरावे कोर्टात सादर केले. त्यावेळी न्यायालयाला मी हे देखील विचारलं होत की मला एनसीबी जर काही चुकीचं काही करत असेल तर त्याविरोधात बोलण्याचा अधिकार आहे का तर त्याला हो असं उत्तर मिळालं होतं. ''


मलिक यांचे जावई समीर खान यांचा जामिनाला एनसीबीनं हायकोर्टात आव्हान दिलंय. ड्रग्ज प्रकरणात समीर खान यांना गेल्या वर्षी जानेवारीमध्ये अटक झाल्यानंतर 27 सप्टेंबरला त्यांना जामीन मंजूर झाला आणि त्यांची जामिनावर सुटका झाली. परवा एनसीबीनं हा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अपील केलंय. एनसीबीच्या या भूमिकेवर नवाब मलिक यांनी टीका केली.


महत्त्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha