Omicron : ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी एक दिलासादायक माहिती दिली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रभाव सौम्य होतोय. घाबरु नका, असं त्यांनी सांगिलंय. गेल्या 24 तासांत भारतात 16 हजार 764 नवीन प्रकरणांसह कोविडची वाढ होत आहे. गुलेरिया यांनी माहिती देताना सांगितले की, अत्यंत संसर्गजन्य ओमायक्रॉन व्हेरियंट मुख्यत्वे वरच्या श्वसनमार्गावर आणि वायुमार्गांवर परिणाम करतात. फुफ्फुसांवर याचा अधिक संसर्ग होत नाही. त्यामुळ ज्यांना ब्ल प्रेशर, मधुमेह किंवा इतर आजार नाही त्यांनी घाबरून जाऊ नये आणि हॉस्पिटलच्या बेड्स ब्लॉक करू नये.


गुलेरिया यांनी पुढे सांगितले की, ''गृह विलगीकरणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. ओमायक्रॉनचा फुफ्फुसांऐवजी वरच्या श्वसनमार्गावर आणि श्वसनमार्गावर परिणाम होत आहे. म्हणूनच ऑक्सिजन कमी झालेले किंवा डेल्टामध्ये समोर आली त्याप्रकारची इतर गंभीर लक्षणे असलेले रुग्ण खूप कमी दिसतात.''
 
''ताप, सर्दी, घसा खवखवणे आणि खूप अंगदुखी आणि डोकेदुखी ही लक्षणे ओमायक्रॉनमध्ये प्रामुख्याने आढळतात.  यापैकी कोणतीही लक्षणे कायम राहिल्यास संशयित रुग्णांनी स्वतःची तपासणी करून घ्यावी आणि विलगीकरणात राहावे. अशाप्रकारे समाजातील इतर लोकांमध्ये संसर्ग पसरण्यापासून रोखू शकतात''


शुक्रवारी, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, जीनोमिक सीक्वेंसिंगद्वारे 1,270 ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. यापैकी 374 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. गुलेरिया यांनी सांगितले, ''घाबरण्याची गरज नाही. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, मागील वेळेच्या विपरीत, या नवीन प्रकारामुळे ऑक्सिजनमध्ये घट होत नाही. म्हणून, ज्यांना इतर आजार नाही त्यांनी गृ विलगीकरणावर भर द्यावा. घाबरुन हॉस्पिटलमध्ये बेड ब्लॉक करणे आवश्यक नाही."


महत्त्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha