Governor BhagatSingh Koshyari on BMC : विधानसभा अध्यक्षपदाच्या (VidhanSabha Speaker) निवडणुकीवरुन ठाकरे सरकार (Cm Uddhav Thackeray) आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor BhagatSingh Koshyari) यांच्यात रंगलेलं लेटर वॉर महाराष्ट्रानं पाहिलं आहे. हे प्रकरण ताजं असतानाच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुंबई महापालिकेच्या खांद्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नवा झटका दिल्याची चर्चा आहे. 


मुंबई महापालिकेच्या (BMC) आश्रय योजनेतील कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश राज्यपालांनी लोकायुक्तांना दिले आहेत. मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेत 1 हजार 844 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप  भाजप आमदार मिहीर कोटेचा आणि काही नगरसेवकांनी केलाय. भाजपच्या शिष्टमंडळानं राज्यपालांना भेटून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. आश्रय योजनेतंर्गत सफाई कर्मचाऱ्यांसाठी घरं बांधण्यात येणार आहेत.


सफाई कामगारांच्या 39 वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या आश्रय योजनेत आतापर्यंत 1 हजार 844 कोटी रुपयांचे प्रस्ताव महापालिकेत मंजूर झाले आहेत. हे प्रस्ताव मंजूर होत असताना भाजपने त्यावर आक्षेप नोंदवला होता. त्यानंतरही प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर भाजपचे स्थायी समिती समिती सदस्य विनोद मिश्रा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन राज्यपालांनी या प्रकरणात लोकायुक्तांना चौकशी करण्याची सूचना केली. 


याआधीही राज्यपालांनी भाजप आमदारांनी केलेल्या तक्रारीनंतर लोकायुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते.  परिवहन विभागातील पदोन्नतीसाठी लाखो रुपयांची वसुली केल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यपालांकडे केली होती. त्यानुसार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोकायुक्तांना आदेश देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. 


इतर महत्वाचा बातम्या



पंतप्रधानांनी 12 कोटींची मर्सिडीज बेन्झ घेतली, आतातरी फकीर म्हणून घेऊ नये : संजय राऊत 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha