एक्स्प्लोर

भुयार खोदून बँकेवर दरोडा, पोलिसांनी 10 लाखांचं सोनं परत मिळवलं!

13 नोव्हेंबर रोजी जुईनगर सेक्टर 11 मधील बँक ऑफ बडोदाच्या शाखेतील 30 पैकी 28 लॉकर्स दरोडेखोरांनी फोडले.

नवी मुंबई : नवी मुंबईतील बँक ऑफ बडोदाच्या दरोड्यात चोरीला गेलेल्या मुद्देमालापैकी 10 लाखांचं सोनं परत मिळवण्यात पोलिसांना यश आलं आहे. सानपाडा पोलिस आणि क्राईम ब्रान्चच्या पथकाने या जबरी दरोड्याप्रकरणी चार जणांना अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी 50 तोळे (500 ग्रॅम) सोन्याचे दागिने नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावातून परत मिळवले. सोन्याचं काम करणाऱ्या संजय वाघ नावाच्या इसमाला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. 13 नोव्हेंबर रोजी जुईनगर सेक्टर 11 मधील बँक ऑफ बडोदाच्या शाखेतील 30 पैकी 28 लॉकर्स दरोडेखोरांनी फोडले. या जबरी दरोड्यात 3 कोटी 19 लाख रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाल्याची नोंद सानपाडा पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. यामध्ये सोन्याचे, चांदीचे, हिऱ्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश आहे. भुयार खोदून बँकेवर दरोडा, चोरट्यांनी कितीचा मुद्देमाल लुटला? पोलिसांनी अटक केलेल्या चार जणांची भूमिका या दरोड्यात मर्यादित होती. भुयारातील ढिगारा बाहेर काढून जुईनगर रेल्वे स्टेशनजवळच्या खुल्या मैदानात जाऊन फेकणं हे त्यांचं काम होतं. हे मैदान बँकेपासून 200 मीटर अंतरावर आहे. दरोड्यानंतर लुटलेले दागिने मुंबईतील ज्या सराफांना विकले, त्यांच्याकडे हे चौघे पोलिसांना घेऊन गेले. त्यामुळे फक्त 10 लाख किंमतीचे 500 ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांना परत मिळाले. मजुरीचं काम केल्याने चोरीमधील थोडीच रक्कम मिळाल्याचं अटक केलेल्या चार जणांनी सांगितलं. मोठं भुयार खोदून बँक लुटली, नवी मुंबईत जबरी दरोडा सूत्रांच्या माहितीनुसार, "नालासोपाऱ्यातील 30 वर्षीय दीपक मिश्रा हा या दरोड्याचा मास्टरमाईंड असल्याची शक्यता आहे. तर नालासोपाऱ्यातीलच 40 वर्षीय कमलेश हादेखील या दरोड्यामधील संशयित आहे. ह्या दोघांकडून 3.19 कोटींपैकी 2 कोटींची रक्कम परत मिळू शकते, असं अंदाज आहे." दरम्यान, पोलिसांच्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी 2.79 कोटींचं 11.40 किलो सोनं, 20.67 लाखांची  6.9 किलो चांदी, 70 हजार रुपये रोख आणि 50 हजार रुपये किंमतीची एक हिऱ्याची अंगठी लांबवली. बँक दरोड्यासाठी खोदलेल्या भुयाराचा व्हिडीओ हाती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal on NDA In Maharashtra : एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
IPL 2024 Jake Fraser-McGurk: माकडामुळे वर्ल्ड कपमधून घ्यावी लागली होती माघार; नावावर आहे भीम पराक्रम, कोण आहे जेक फ्रेझर-मॅकगर्क?
माकडामुळे वर्ल्ड कपमधून घ्यावी लागली होती माघार; नावावर आहे भीम पराक्रम, कोण आहे जेक मॅकगर्क?
IPL 2024 Jake Fraser-McGurk: बुमराहचे दिवसभर व्हिडीओ बघत बसला, समोर येताच गगनचुंबी षटकार ठोकला, मॅकगर्क काय म्हणाला?
बुमराहचे दिवसभर व्हिडीओ बघत बसला, समोर येताच गगनचुंबी षटकार ठोकला, मॅकगर्क काय म्हणाला?
Sahil Khan: महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, अभिनेता साहिल खान ताब्यात
महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, छत्तीसगढमधून अभिनेता साहिल खान ताब्यात
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sharad Pawar Shevgan Rally : निलेश लंकेंच्या प्रचारार्थ शरद पवारांची आज शेवगावमध्ये सभाEknath Shinde Meeting : कोल्हापूरसंदर्भात मुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा बैठक, घाटगेंसोबत चर्चाSanjay Pandey : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यताUjjwal Nikam  Mumbadevi :  उज्जवल निकम मुंबा देवीच्या दर्शनाला : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal on NDA In Maharashtra : एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
IPL 2024 Jake Fraser-McGurk: माकडामुळे वर्ल्ड कपमधून घ्यावी लागली होती माघार; नावावर आहे भीम पराक्रम, कोण आहे जेक फ्रेझर-मॅकगर्क?
माकडामुळे वर्ल्ड कपमधून घ्यावी लागली होती माघार; नावावर आहे भीम पराक्रम, कोण आहे जेक मॅकगर्क?
IPL 2024 Jake Fraser-McGurk: बुमराहचे दिवसभर व्हिडीओ बघत बसला, समोर येताच गगनचुंबी षटकार ठोकला, मॅकगर्क काय म्हणाला?
बुमराहचे दिवसभर व्हिडीओ बघत बसला, समोर येताच गगनचुंबी षटकार ठोकला, मॅकगर्क काय म्हणाला?
Sahil Khan: महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, अभिनेता साहिल खान ताब्यात
महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, छत्तीसगढमधून अभिनेता साहिल खान ताब्यात
IPL 2024 DC vs MI: रोहित शर्माने पतंग देताच ऋषभ पंत ती भर मैदानात उडवू लागला; पुढे काय घडलं?, पाहा मजेशीर Video
रोहित शर्माने पतंग देताच ऋषभ पंत ती भर मैदानात उडवू लागला; पुढे काय घडलं?, पाहा मजेशीर Video
Eknath Shinde: मोदींच्या सभेनंतर एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्येच थांबले, समरजितसिंह घाटगेंसोबत बंद खोलीत चर्चा, कागलमधून रेकॉर्डब्रेक मताधिक्याची हमी
मोदींच्या सभेनंतर एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्येच थांबले, समरजितसिंह घाटगेंसोबत बंद खोलीत चर्चा, कागलमधून रेकॉर्डब्रेक मताधिक्याचा शब्द
IPL 2024 Latest Points Table: दिल्लीची मोठी झेप, मुंबईची नवव्या क्रमांकावर घसरण; पाहा आयपीएलचे Latest Points Table
दिल्लीची मोठी झेप, मुंबईची नवव्या क्रमांकावर घसरण; पाहा आयपीएलचे Latest Points Table
Horoscope Today 28 April 2024 : एप्रिलचा शेवटचा रविवार 12 राशींसाठी शुभ की अशुभ? वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
एप्रिलचा शेवटचा रविवार 12 राशींसाठी शुभ की अशुभ? वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Embed widget