एक्स्प्लोर
विमानतळाच्या जागेसाठी सिडकोकडून फसवणूक, शेतकऱ्यांचा स्थलांतराला विरोध
पनवेल येथे उभे राहत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी 18 पैकी 10 गावांचे संपूर्ण स्थलांतर होणे गरजेचे आहे. परंतु त्यापैकी दोन गावांनी स्थलांतराला विरोध केला आहे.
नवी मुंबई : पनवेल येथे उभे राहत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी 18 पैकी 10 गावांचे संपूर्ण स्थलांतर होणे गरजेचे आहे. परंतु त्यापैकी दोन गावांनी स्थलांतराला विरोध केला आहे. आपल्याला देण्यात आलेले पुनर्वसन पॅकेज योग्य नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. सिडकोने विकसीत भूखंड देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पनवेल तालुक्यांतील 18 गावांच्या जमिनी सिडकोने विमानतळासाठी हस्तांतरण करुन घेतल्या आहेत. यापैकी 10 गावांचे जमिनीसहीत पूर्णपणे हस्तांतरण करण्यात आले आहे. त्यामुळे या 10 गावांना इतर ठिकाणी स्थलांतरीत करण्यात येणार आहे. यासाठी सिडकोने प्रकल्पग्रस्तांना पॅकेज दिले आहे. स्थलांतरीत होणाऱ्या गावकऱ्यांचे सिडकोने उळवे भागांत पुनर्वसन केले आहे. परंतु दोन गावांनी अजूनही स्थलांतरीत होण्यास विरोध केला आहे.
सिडकोने दिलेले भूखंड आपल्या घरांच्या तिप्पट क्षेत्रफळाचे नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. मुळ घरांचे क्षेत्रफळ मोजताना घराचे अंगण, पायरीचा भाग न घेता फक्त चार भिंतीच्या आतील भाग मोजला. त्यामुळे आमची फसवणूक झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. गावातील ग्रामदेवतेचे मंदिर, समाजमंदिर, स्मशानभूमी यांचा प्रश्न अद्याप सुटलेला नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
विमानतळासाठी गावकऱ्यांचे स्थलांतर योग्य वेळेत होत आहे. काही गावकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सिडको अग्रही आहे. - प्रशांत ठाकूर (अध्यक्ष, सिडको)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement