एक्स्प्लोर

तुकाराम मुंढेंविरोधात सर्वपक्षीय नगरसेवकांची पोलिसात धाव

नवी मुंबई: आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर, सर्वपक्षीय नगरसेवकांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. तुकाराम मुंढे यांना नवी मुंबई महापालिकेत येण्यास मज्जाव करावा, अन्यथा कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असं महापौर सुधाकर सोनावणे आणि सर्वपक्षीय नगरसेवकांनी पोलिसांत म्हटलं आहे. आयुक्त तुकाराम मुंढेविरोधात अविश्वास ठराव मंजूर दरम्यान आज नवी मुंबई पालिकेत आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधातील अविश्वास ठराव 105 विरुद्ध 6 मतांनी मंजूर झाला. या अविश्वासाच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने मतदान केलं. तर भाजपने तुकाराम मुंढे यांच्या बाजूने मतदान केलं. तुकाराम मुंढेंवरील आरोप आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर महापौर, नगरसेवक, लोकप्रतिनिधींचा अवमान करणे, महासभेत धोरणात्मक प्रस्ताव न आणता परस्पर निर्णय घेणे, स्थायी समितीच्या निर्णयावर गदा आणणे, आदी आरोप ठेवण्यात आले आहेत. सामान्य नागरिक तुकाराम मुंढेंच्या पाठिशी असं असलं तरी सर्वसामान्य मुंबईकर मात्र तुकाराम मुंढे यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत.नवी मुंबईकरांनी मुंढेंना वाचवण्यासाठी ‘सेव्ह तुकाराम मुंढे’ मोहीम सुरु केली आहे. वाशी रेल्वे स्थानकाजवळ नवी मुंबईकरांनी एकत्रित येऊन ‘वॉक फॉर आयुक्त’ हे अभियान राबवलं गेलं. यावेळी ‘संडे हो या मंडे, आयुक्त हवेत मुंढे’ असे फलक हाती घेऊन, तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या गेल्या. आरोपांबाबत मला बोलण्याची संधीच मिळाली नाहीः तुकाराम मुंढे माझ्यावरच्या आरोपांबाबत मला बोलण्याची संधीच मिळाली नाही, असा दावा नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला. आज नवी मुंबई महापालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादीसह काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्त मुंढे यांच्याविरोधात मतं टाकून अविश्वास ठराव मंजूर केला. मात्र, भाजप नगरसेवकांनी  तुकाराम मुंढे यांच्या बाजून मतदान केलं. ठरावाची पुढील प्रक्रिया हा अविश्वास ठराव आता नगरविकास खात्याकडे जाणार आहे. नगरविकास खातं हे मुख्यमंत्र्यांकडेच असल्यानं आता ते यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष आहे. महापौरांची मागणी दरम्यान, आयुक्तांविरोधातला हा प्रस्ताव तात्काळ स्वीकारुन मुख्यमंत्र्यांनी दुसरा अधिकारी पाठवावा, अशी मागणी नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी केली आहे. सेना-भाजपमध्ये जुंपली तुकाराम मुंढेंविरोधातील प्रस्तावावरुन शिवेसना आणि भाजपत चांगलीच जुंपली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दडपणामुळे भाजपच्या 6 नगरसेवकांनी प्रस्तावाला पाठिंबा दिल्याचा आरोप सेनेनं केला आहे. तसंच या सगळ्यांचं ब्रेन मॅपिंग करण्याची मागणीही नामदेव भगत यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

आयुक्त तुकाराम मुंढेविरोधात अविश्वास ठराव मंजूर आरोपांबाबत मला बोलण्याची संधीच मिळाली नाहीः तुकाराम मुंढे राष्ट्रवादी काँग्रेसने हाकलेले कर्तव्यनिष्ठ आयएएस अधिकारी सुट्टीवर जाणार नाही, तुकाराम मुंढेंचं स्पष्टीकरण ‘संडे हो या मंडे, आयुक्त हवेत मुंढे’; तुकाराम मुंढेंसाठी नवी मुंबईकर रस्त्यावर तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव, शिवसेनेत दोन मतप्रवाह आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव …तर तुकाराम मुढेंविरोधात हक्कभंग आणू : मंदाताई म्हात्रे तुकाराम मुंढेंनी नवी मुंबई आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला! नवी मुंबईकरांच्या समस्या जाणण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रम नवी मुंबईतील 20 झुणका भाकर केंद्र सील, आयुक्त तुकाराम मुंढेंची कारवाई तुकाराम मुंढेंचा नवी मुंबईत धडक कारवाई, 6 कामचुकार अधिकाऱ्यांचं निलंबन

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Ashram School Student Deaths: आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
Mumbai Taj Lands End vs BMC: ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Embed widget