एक्स्प्लोर

Navi Mumbai Bribe Case : नवी मुंबईत शिक्षण मंडळाच्या विभागीय अध्यक्षाने लाज आणली, 20 हजारांची लाच घेताना राजेंद्र अहिरेंना रंगेहाथ अटक

Navi Mumbai Bribe Case : ७ एप्रिल रोजी सापळा रचून आहिरे यांना त्यांच्या केबिनमध्ये तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना पकडण्यात आले. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) मुंबई विभागीय कार्यालयात मोठी कारवाई (Navi Mumbai Bribe Case) करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) विभागीय अध्यक्ष राजेंद्र आहिरे (वय ५५) यांना २२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.(Navi Mumbai Bribe Case)

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक धर्मराज सोनके यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला १ सप्टेंबर २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीसाठी वाशी येथील मंडळाच्या कार्यालयातील विद्युत देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट देण्यात आले होते. नोव्हेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीतील सुमारे ३.१६ लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी आहिरे यांनी ७ टक्के कमिशन म्हणून २२,१७६ रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. ही मागणी भांडार विभाग प्रमुख मनोहर पवार यांच्या माध्यमातून करण्यात आली होती.(Navi Mumbai Bribe Case)

२५ मार्च रोजी तक्रारदाराने ACB कडे तक्रार दाखल केल्यानंतर ६ एप्रिल रोजी पडताळणी करण्यात आली आणि लाच मागणीची खात्री पटली. त्यानंतर ७ एप्रिल रोजी सापळा रचून आहिरे यांना त्यांच्या केबिनमध्ये तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना पकडण्यात आले. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Navi Mumbai Bribe Case)

दरम्यान, याच आहिरे यांनी यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात एका वेगळ्या प्रकरणात तक्रार दिली होती. निवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्यासह १९ जणांविरोधात फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि विश्वासघाताचे आरोप करण्यात आले होते. अलीबाग आणि खोपोली येथील दोन शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक भरतीसाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचा आरोप होता.

या प्रकरणात २०१८ पासून सुमारे १.२५ कोटी रुपयांच्या सरकारी वेतन अनुदानाचा अपहार झाल्याचा आरोप आहिरे यांनी केला होता. मात्र, आता स्वतः आहिरेच लाच प्रकरणात अटकेत आल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली असून, पुढील तपास सुरू आहे.

Navi Mumbai Bribe Case : राजेंद्र अहिरे कोण आहेत?

मागील अनेक वर्षांपासून ते शिक्षण विभागात विविध पदांवर कार्यरत आहेत
* सुरुवातीला ते मुंबई विभागात शिक्षण निरीक्षक म्हणून कार्यरत होते
* त्यानंतर त्यांची बदली राज्य मंडळाच्या नाशिक विभागीय सचिव पदी झाली 
* काही काळ मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक म्हणून कार्यरत होते 
* छत्रपती संभाजी नगर विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी काम पाहिला आहे 
* सध्या राज्य मंडळाच्या मुंबई विभागीय अध्यक्ष पदी राजेंद्र अहिरे मागील काही दिवसांपासून काम पाहत आहेत

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
संतापजनक! लोकलमध्ये बसण्यावरुन वाद, 62 वर्षाच्या दिव्यांग प्रवाशाला धावत्या गाडीतून खाली ढकललं, प्रवाशाचा मृत्यू 
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget