एक्स्प्लोर

नवी मुंबईत आईच्या डोळ्यादेखत चिमुरड्याचा बसखाली चिरडून मृत्यू

नवी मुंबई : नवी मुंबईतल्या नेरुळमध्ये एका नऊ वर्षांच्या चिमुरड्याचा स्कूल बसखाली चिरडून मृत्यू झाला आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आईच्या डोळ्यादेखतच बसने विद्यार्थ्याला धडक दिली होती. सोमवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. नवी मुंबईतल्या नेरुळमधील सेक्टर 27 भागात राहणारा सामवेद तरळकर एनसीआरडी स्टर्लिंग स्कूलमध्ये शिकतो. शाळेतून परत आलेला सामवेद त्याच्या स्कूल बसमधून उतरला. इश्वर ब्लिस या आपल्या बिल्डिंगकडे येण्यासाठी तो रस्ता ओलांडत होता. पलिकडे असलेल्या इमारतीच्या गेटवर त्याची आई त्याला आणण्यासाठी उभी राहिली होती. त्याचवेळी भरधाव वेगानं आलेल्या दुसऱ्या एका प्रायव्हेट स्कूलबसने सामवेदला जोरदार धडक दिली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे चिमुरड्याच्या आईच्या डोळ्यांदेखतच हा अपघात घडला. सामवेदला तात्काळ नेरुळमधील अपोलो रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं. 21 वर्षीय आरोपी बसचालक गोविंद रायला अटक करण्यात आली आहे. सामवेदला उडवल्यानंतर चालकाने बससह पळ काढला. अन्सारी एन्टरप्रायझेसने गोविंदची नियुक्ती केली होती. त्याच ऑफिसमधून त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गोविंदला रॅश ड्रायव्हिंग आणि हलगर्जीमुळे विद्यार्थ्याच्या मृत्यूला जबाबदार ठरल्याप्रकरणी अटक झाली आहे. संबंधित चालकाने बेदरकारपणे बस चालवल्यामुळेच आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा जबाब, त्याच्या आईने दिला आहे. सामवेदचे वडील विद्याधर तरळकर हे अंधेरीतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत आहेत, तर त्याची आई गृहिणी आहे. सामवेदची सहा वर्षांची धाकटी बहिण सेंट ऑगस्टिन शाळेत शिकते.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा

ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी

Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा

व्हिडीओ

Seher Shaikh MIM : मुंब्रा पूर्णपणे हिरवा करू, विरोधकांच्या अहंकाराला मातीमोल केलंय- सहर शेख
Kishor Jorgewar Chandrapur : काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवा पळवीची स्पर्धा सुरू
Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा

निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात

सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली

Embed widget