एक्स्प्लोर

नारायण राणेंना अॅट्रॉसिटीच्या खटल्यात हायकोर्टाचा तूर्तास दिलासा

हायकोर्ट यासंदर्भात अंतिम निकाल देत नाही तोपर्यंत सत्र न्यायालयातील संबंधित खटल्याला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली.

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी दाखल केलेली याचिका स्वीकारत अॅट्रॉसिटी खटल्यातून मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना तूर्तास दिलासा दिलाय. हायकोर्ट यासंदर्भात अंतिम निकाल देत नाही तोपर्यंत सत्र न्यायालयातील संबंधित खटल्याला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली. न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे यावर मंगळवारी सुनावणी झाली. नारायण राणे, बाळा नांदगावकर आणि नारायण राणेंचे निकटवर्तीय रवी शेंडगे यांना अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्यातून दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाने नकार दिल्यानंतर यांनी हायकोर्टात दाद मागितली होती. काय आहे प्रकरण? 2002 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार पद्माकर वळवी यांचं अपहरण केल्याबद्दल या तिघांवर हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी तिघांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावेळी नारायण राणे आणि बाळा नांदगावकर हे दोघेही शिवसेनेत होते. काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार पाडण्यासाठी युती सरकारने 2002 मध्ये बराच जोर लावला होता. सरकारविरोधात अविश्वास ठराव आणल्यानंतर बराच गदारोळ झाला. याचदरम्यान राष्ट्रवादीचे तात्कालीन आमदार पद्माकर वळवी यांचं अपहरण करून त्यांना जबदस्तीने मातोश्री स्पोर्ट्स क्लबवर डांबून ठेवल्याचा आरोप या तिघांवर करण्यात आलाय. 5 जून ते 12 जून दरम्यान वळवी यांना डांबून ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी नारायण राणे आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेही तिथे उपस्थित होते, असा दावा वळवी यांनी केला होता. मात्र 13 जून 2002 ला विलासरावांनी बहुमत सिद्ध करून आघाडी सराकारची सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवलं होतं. दरम्यान, वळवी यांच्याकडून जबरदस्तीने युती सरकारला पाठिंबा असल्याचं राज्यपालांच्या नावे पत्रही लिहून घेण्यात आलं, असाही आरोप वळवी यांच्याकडून करण्यात आल्याचा आरोपही वळवी यांनी आपल्या जबानीत दिला होता.

महत्त्वाच्या बातम्या

पक्षप्रवेश होताच काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; विधानपरिषदेसाठी शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरेंना उमेदवारी
पक्षप्रवेश होताच काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; विधानपरिषदेसाठी शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरेंना उमेदवारी
Pujya Gurudevshri Rakeshji : मुंबईत जन्म, मुंबईतच षष्ठ्यब्दीपूर्ती! पूज्य गुरुदेवश्री राकेशजींच्या 'अहो गुरुदेव' सोहळ्याला दिग्गजांची मांदियाळी
मुंबईत जन्म, मुंबईतच षष्ठ्यब्दीपूर्ती! पूज्य गुरुदेवश्री राकेशजींच्या 'अहो गुरुदेव' सोहळ्याला दिग्गजांची मांदियाळी
अमित शाहांनी 20 जुलैला चूक केली, ती चूक तुम्ही करू नका; अभिजीत दिपकेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर पलटवार
अमित शाहांनी 20 जुलैला चूक केली, ती चूक तुम्ही करू नका; अभिजीत दिपकेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर पलटवार
Maharashtra LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

व्हिडीओ

Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! वडिलांनीच सख्ख्या मुलीला संपवलं, साताऱ्याच्या हद्दीत टाकून दिलं; अखेर 15 दिवसांनी हत्येचा उलगडा
धक्कादायक! वडिलांनीच सख्ख्या मुलीला संपवलं, साताऱ्याच्या हद्दीत टाकून दिलं; अखेर 15 दिवसांनी हत्येचा उलगडा
पक्षप्रवेश होताच काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; विधानपरिषदेसाठी शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरेंना उमेदवारी
पक्षप्रवेश होताच काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; विधानपरिषदेसाठी शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरेंना उमेदवारी
Mundhwa land deal case : 1 टक्का भागीदारावर कारवाई, मग 99 टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार, सुनावणीवेळी काय घडलं?
1 टक्का भागीदारावर कारवाई, मग 99 टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार, सुनावणीवेळी काय घडलं?
Maharashtra MLC Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
Gold Silver Rate Today: दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदी 'जैसे थे' जाणून घ्या ताजे भाव
दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदी 'जैसे थे' जाणून घ्या ताजे भाव
‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरुन चौफेर टीका; आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा, स्पष्टीकरण देताना सांगितली भावना
‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरुन चौफेर टीका; आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा, स्पष्टीकरण देताना सांगितली भावना
Thane Crime Pradeep Purnekar death: पप्या तू त्याचा मित्र होतास ना, एकाच ताटात जेवलास अन्... प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा आक्रोश, सगळ्यांना गहिवरुन आलं
पप्या तू त्याचा मित्र होतास ना, एकाच ताटात जेवलास अन्... प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा आक्रोश, सगळ्यांना गहिवरुन आलं
Embed widget