Narayan Rane Case Reactions: 'आजचा दिवस थोडक्यात' म्हणत संजय राऊतांकडून वाघानं कोंबडी खाल्ल्याचा मिम्स शेअर, राणे म्हणाले...
भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज एक मिम शेअर करत नारायण राणे यांचं (Narayan Rane) नाव न घेता निशाणा साधला आहे.
मुंबई : कालचा दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्वाचा दिवस. सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि मंगळवारी त्यावरुन राजकीय धुरळा उडाला. यानंतर शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज एक मिम शेअर करत निशाणा साधला आहे. वाघाच्या तोंडात कोंबडी असल्याचा फोटो शेअर करत 'आजचा दिवस थोडक्यात' असं ट्वीट राऊतांनी केलं आहे.
Narayan Rane : आंदोलन...अटक आणि अखेर जामीन; काय घडलं काल दिवसभरात?
Today pic.twitter.com/aykNVylSAZ
— Sanjay Raut (@rautsanjay61) August 25, 2021
राणेंनी मानले सहकाऱ्यांचे आभार
दरम्यान नारायण राणे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, कालच्या प्रसंगामध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माझ्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व माझ्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार, असं राणे यांनी म्हटलं आहे.
कालच्या प्रसंगामध्ये माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माझ्या पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व माझ्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार !!
— Narayan Rane (@MeNarayanRane) August 25, 2021
धन्यवाद! @BJP4Maharashtra @BJP4India #JanAshirwadYatra
राणे यांनी रात्री उशीरा जामीन मिळाल्यानंतर सत्यमेव जयते म्हणत ट्वीट केलं होतं.
— Narayan Rane (@MeNarayanRane) August 24, 2021
सामनाच्या अग्रलेखातून राणेंवर टीका, म्हटलं राणे म्हणजे पडलेला फुगा
सामनाच्या अग्रलेखात नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, नारायण राणे हे कधीच महान किंवा कर्तबगार नव्हते. शिवसेनेत असताना त्यांचे नाव झाले ते सत्तेच्या शिड्या जलदगतीने चढता आल्यामुळेच. राणे यांनी शिवसेना सोडल्यावर त्यांचा लोकसभा आणि विधानसभेत चार वेळा शिवसेनेने दणकून पराभव केला. त्यामुळं राणे यांचे थोडक्यात वर्णन करायचेच झाले तर भोकं पडलेला फुगा असेच करता येईल, असं सामनात म्हटलं आहे.
'नारायण राणे म्हणजे भोकं पडलेला फुगा', 'सामना'तून शिवसेनेचा हल्लाबोल
लेखात म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदी यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या 'महात्मा' नारोबा राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याची भाषा केली. पंतप्रधानांच्या बाबतीत कुणी असे विधान केले असते तर त्यास देशद्रोहाच्या आरोपाखाली एव्हाना तुरुंगात डांबले असते. नारोबा राणे यांचा गुन्हा त्याच प्रकारचा आहे. महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य आहे आणि एका मर्यादेपलीकडे ही बेताल बादशाही खपवून घेतली जाणार नाही हे तीने दाखवून द्यायची हीच वेळ आहे, असं सामनात म्हटलं आहे. पंतप्रधान मोदी हा बेतालपणा सहन करणार नाहीत. मुख्यमंत्र्यांवर हात टाकण्याची भाषा करणारा कोणीही असो त्यांचे हात कायदेशीर मार्गाने उखडलेलेच बरे. पंतप्रधान मोदी यांना मारण्याचा नुसता कट रचल्याच्या (?)आरोपाखाली काही विचारवंतांना फडणवीस सरकारनेच तुरुंगात सडवलेच आहे. इथे नारोबा राणे यांनी मुख्यमंत्र्यांना मारण्याची सुपारी घेतल्याचे दिसत आहे. आता सुपारीबाजांची महाराष्ट्रात आरती ओवाळायची काय? असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, नारायण राणे हे कधीच महान किंवा कर्तबगार नव्हते. शिवसेनेत असताना त्यांचे नाव झाले ते सत्तेच्या शिड्या जलदगतीने चढता आल्यामुळेच. राणे यांनी शिवसेना सोडल्यावर त्यांचा लोकसभा आणि विधानसभेत चार वेळा शिवसेनेने दणकून पराभव केला. त्यामुळं राणे यांचे थोडक्यात वर्णन करायचेच झाले तर भोकं पडलेला फुगा असेच करता येईल. हा फुगा कितीही हवा भरुन फुगवला तरी वर जाणार नाही पण भाजपने सध्या हा भोकवाला फुगा फुगवून दाखवण्याचे ठरवले आहे.
Narayan Rane : 'मगर आसमान में थुंकने वालो...करारा जवाब मिलेगा'; नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा
शिवसेनेनं म्हटलं आहे की, राणे यांना काही लोकं डराव डराव करणाऱ्या बेडकाचीही उपमा देतात. राणे हे बेडुक असतील किंवा भोकवाला फुगा पण राणे कोण हे त्यांनी स्वत:च जाहीर केले आहे, मी नॉर्मल माणूस नाही असे त्यांनी जाहीर केले आहे. मग ते एबनॉर्मल आहेत काय हे तपासावे लागेल. मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये अती सूक्ष्म खात्याचे ते लघु मंत्री आहेत. मंत्रिपदाची झुल अंगावर चढवूनही राणे हे एखाद्या छपरी गॅंगस्टरसारखेच वागत-बोलत आहेत. म्हणूनच नॉर्मल असलेल्या राणेंनी मुख्यमंत्र्यांना मारहाण करण्याची बेलगाम भाषा केली.