एक्स्प्लोर
नालासोपाऱ्यात सातव्या मजल्यावरुन पडून चिमुकलीचा अंत
ग्रीलवर चढून खाली डोकावून पाहत असताना दीड वर्षांत्या प्रियलचा तोल गेला. डासांची जाळी तुटून ती थेट खाली कोसळली. या दुर्दैवी अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला.
नालासोपारा : मुंबईजवळच्या नालासोपाऱ्यात इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन कोसळून दीड वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. बाल्कनीत खेळता-खेळता खाली डोकावून पाहताना तिचा तोल गेला.
दीड वर्षांची प्रियल दास नालासोपाऱ्यातील यशवंत गॅलक्सी कॉम्प्लेक्समधील 'संदीप हाईट्स' या इमारतीत कुटुंबासोबत राहत होती. तिच्या घरातील बाल्कनीला ग्रीलचा कठडा होता, तर वरच्या बाजूला डासांची जाळी बसवण्यात आली होती.
प्रियलची आई 16 नोव्हेंबरला संध्याकाळी पावणेपाच वाजताच्या सुमारास किचनमध्ये काम करत होती. त्यावेळी प्रियल खेळत खेळत बाल्कनीत गेली. ग्रीलवर चढून खाली डोकावून पाहत असताना तिचा तोल गेला. डासांची जाळी तुटून प्रियल थेट खाली कोसळली. या दुर्दैवी अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला.
बाल्कनीला ग्रील लावण्यासाठी बिल्डरला चार ते पाच वेळा परवानगी मागितली होती. मात्र बिल्डरने परवानगी न दिल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप प्रियलच्या वडिलांनी केला आहे.
हलगर्जीबाबत बिल्डरवर कोणताच गुन्हा दाखल केला नसून नालासोपारा पोलिसांनी केवळ आकस्मिक मृत्यची नोंद केली आहे. लहान मुलं खेळताना त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement