एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरची जागा ताब्यात घेण्याचे राज्य सरकारचे आदेश
मुंबई : मुंबईतील कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेंड सेंटरची जागा ताब्यात घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे वर्ल्ड ट्रेंड सेंटरची सुमारे 48,025 स्क्वेअर मीटर जागा ताब्यात घेतली जाणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची सुनावणी सुरु होती. जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी कारवाई करत जागा ताब्यात घेण्याचे आदेश काल जारी केले आहेत.
वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये पोटभाडेकरू ठेवणे, परस्पर गाळे विकणे, 2012 पासून राज्य सरकारचे सुमारे 20 कोटी रुपयांचे भाडे थकवणे अशा अनेक गोष्टींमध्ये अनियमितता आढळल्यानं राज्य सरकारनं ही कारवाई केली आहे. 1970 साली राज्य सरकारकडून एम विश्वेश्ववरय्या इंडस्ट्रीयल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरला भाडेपट्याने ही जागा देण्यात आली होती. राज्यात व्यापार वाढवण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला होता.
विश्वस्तांनी राज्य सरकारला डावलून वर्ल्ड ट्रेड सोबत स्वतंत्र करार केला होता. त्यामुळेच या इमारतीला वर्ल्ड ट्रेड सेंटरची ओळख मिळाली. जागा ताब्यात घेण्याचे आदेश देत पुढील अपिलात जाऊ नये यासाठी राज्य सरकारकडून हायकोर्टात कॅविटही दाखल करण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement