एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुसळधार पावसामुळे मुंबई तुंबली : महापौर
विश्वनाथ महाडेश्वरांनी मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याचं सांगत मुंबई महापालिकेची यंत्रणा योग्य रितीनं काम करत असल्याचा दावा केला आहे
मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. एकीकडे साचलेल्या पाण्याबद्दल जनता महापालिकेला बोल लावत आहे, तर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुसळधार पावसामुळे पाणी तुंबल्याचं सांगितलं आहे.
विश्वनाथ महाडेश्वरांनी मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याचं सांगत मुंबई महापालिकेची यंत्रणा योग्य रितीनं काम करत असल्याचा दावा केला आहे. पम्पिंग स्टेशन सुरु असल्यामुळे इतक्या पाण्याचा निचरा झाला, नाहीतर आणखी पाणी भरलं असतं, असं महापौर म्हणाले.
पाणी भरलं ही वस्तुस्थिती मान्य आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे निसर्गाच्या आपत्तीला सामोरं जाण्याचे प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. BMC, NDRF, Navy, सर्वपक्षीय नगरसेवक परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचंही त्यांनी सांगितलं.
नालेसफाईची कामं झाली आहेत, मात्र इतक्या प्रमाणात पावसाचं पाणी वाहून नेण्याची नाल्यांची क्षमता नसते, असंही महाडेश्वर म्हणाले.
दादर, हिंदमाता, सायन परिसरात ड्रेनेज सिस्टीमची पंपाद्वारे पाणी खेचण्याची क्षमता संपली. प्रतितास 40 मिमी पाणी उपसण्याचीच ड्रेनेज सिस्टीमची क्षमता असते. मात्र एफ दक्षिण या एकट्या विभागातच सकाळपासून 240 मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची तयारी काय?
वॉर्ड लेव्हलला प्रथमोपचार केंद्र सुरु
जवळच्या शाळा आणि मंदिरांमध्ये पावसात अडकलेल्या नागरिकांच्या निवासाची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टनेही गरजूंना सिद्धिविनायक मंदिरात राहण्याची सोय केल्याची माहिती अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली आहे.
पावसात अडकलेल्या गाड्यांना बाहेर काढलं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement