एक्स्प्लोर

Mumbai Water Supply : मुंबईत 10 टक्के पाणी कपात सुरू; दररोज 520 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा कमी होणार

Mumbai Water Cut : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील साठा 22 टक्क्यांवर आल्याने 10 टक्के पाणी कपात लागू होणार आहे. मात्र पाणीपुरवठ्याच्या वेळेत कोणताही बदल होणार नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं.

Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शुक्रवारपासून मुंबईत 10 टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. सध्या मुंबईला दररोज सुमारे 5200 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र या निर्णयामुळे दररोज तब्बल 520 दशलक्ष लिटर पाणी कमी पुरवलं जाणार आहे. धरणांमधील पाणीसाठा केवळ 22 टक्क्यांवर आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आगामी काही आठवड्यांत पाण्याची परिस्थिती नियंत्रणात राहावी आणि उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करता यावे यासाठी ही कपात करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मान्सूनपूर्व कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे.

BMC Water Supply : पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल नाही

पाणी कपात लागू होत असली तरी मुंबईतील पाणीपुरवठ्याच्या वेळांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. नागरिकांना सध्या ज्या वेळेत पाणी मिळते, त्याच वेळेत पाणीपुरवठा सुरू राहील. तसेच पाण्याचा दाब शक्य तितका कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

High Rise Areas Water Supply : उंच भागांवर विशेष लक्ष

विशेषतः उंच भागांमध्ये पाणी व्यवस्थित पोहोचत आहे की नाही, यावर अधिकाऱ्यांकडून बारकाईने लक्ष ठेवलं जाणार आहे. पाणी कपातीचा परिणाम कमी करण्यासाठी वितरण व्यवस्थेवर सतत नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

Dam Storage Crisis : धरणसाठा घटल्याने निर्णय

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील एकूण पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. सध्या उपलब्ध साठा केवळ 22 टक्क्यांवर पोहोचल्याने मुंबई महानगरपालिकेला पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागला. मान्सून वेळेत दाखल होईपर्यंत पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

MMR Water Situation : एमएमआरमधील इतर शहरांतील स्थिती

ठाणे महानगरपालिकेने सध्या कोणतीही अधिकृत पाणी कपात जाहीर केलेली नाही. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातही पाणी कपात लागू नसल्याचं सांगण्यात आलं आहे. वसई-विरार महानगरपालिकेतही सध्या पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने अद्याप पाणी कपातीबाबत निर्णय घेतलेला नसून पुढील आठवड्यात धरणातील पाण्याची पातळी पाहून निर्णय घेतला जाणार आहे. मीरा-भाईंदरमध्ये यापूर्वी 31 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता, मात्र सध्या पाणीपुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Mumbai Water Saving Appeal : पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन

मुंबईत 10 टक्के पाणी कपात लागू होत असल्यानं नागरिकांनी अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा, गळती त्वरित दुरुस्त करावी आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget