रायगड :  गेल्या काही वर्षांपासून बहुतांश ग्राहक हे ऑनलाइन खरेदीला मोठी पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. त्याचाच फायदा घेऊन ओएलएक्स ॲपवरून वाहनांच्या विक्रीचा व्यवहार करीत ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींना उरण पोलिसांनी अटक केली आहे. 


ओएलएक्सवर फॉर्च्युनर गाडी अवघ्या अठरा लाख रुपयात विकायची असल्याची जाहिरात देण्यात आली होती. यामध्ये, इंटरनेटवरील वाहनांचे फोटो टाकण्यात आले होते. ही गाडी विक्री करण्याच्या बहाण्याने ग्राहकांकडून ॲडव्हान्स म्हणून ऑनलाईन पैसे मागवण्यात आले होते. यावेळी, ग्राहकाकडून सुमारे 50  हजार रुपये घेऊन आरोपींनी मोबाईल बंद करून ठेवला. आपली फसवणूक करण्यात आली असल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित ग्राहकाने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांनी   तपास करून नागपूर येथील मयूर धानोरकर, सनी चोपडे आणि मनीष बालपांडे यांना अटक केली. 


तर, दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये उरण आणि नवी मुंबई परिसरात घरफोडी आणि वाहनचोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये, आरोपी हे चोरी केलेली गाडी अल्प किमतीत विकत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये, अल्पवयीन आरोपीसोबत करण मगरे आणि अक्षय निवळकर यांना अटक करण्यात आली आहे. तर, या तिन्ही आरोपींकडून सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या सात मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.


महत्वाच्या बातम्या