मुंबई : अनिल देशमुखांकडून किंवा त्यांच्या ऑफीसमधील कुणीही कधी बार किंवा अन्य कुठूनही पैसे वसुल करण्यासाठी सांगितलं नव्हतं. अशी माहिती सचिन वाझेनं मंगळवारी चांदीवाल आयोगासमोर दिली. त्यामुळे परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रातून अनिल देशमुखांवर केलेल्या खळबळजनक भ्रष्टाचाराच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

 

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चांदिवाल आयोगासमोर मंगळवारी सचिन वाझेची उलटतपासणी झाली. ज्यात “बार मालकांकडून पैसे गोळा करायला अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं का?" यावर "मला काही आठवत नाही" या सचिन वाझेच्या उत्तरानं सर्वजण बुचकुळ्यात पडले. कारण सचिन वाझे यांच्या या उत्तरानं हे खरंच अनिल देशमुख यांनी बार मालकांकडनं पैसे गोळा करायला सांगितले होतं का?, हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.

 

तर चांदिवाल आयोगात वाझेने नेमकी काय उत्तर दिली यावर एक नजर फिरवूया... 

 

प्रश्न १: आपण CIU मध्ये ज्या केसचा तपास केला त्या केसमध्ये आरोपपत्र दाखल झालं आहे का? 

 

सचिन वाझे : माझ्या काळातील सर्व केस मध्ये आरोपपत्र दाखल केलेलं आहे.

 

प्रश्न २ : ज्या केसमध्ये तुम्ही आरोपपत्र दाखल केलत. त्या केस मध्ये आपण वरिष्ठांच्या हस्तक्षेपाशिवाय हे आरोपपत्र दाखल केलंत का? 

 

सचिन वाझे : हो

 

प्रश्न ३ : राजकीय व्यक्तींच्या आदेशाशिवाय त्यांच्या आदेशाची दखल न घेता आरोपपत्र दाखल केले होते का?

 

सचिन वाझे : कोणत्याही राजकीय व्यक्तींनी कधी माझ्या तपासत हस्तक्षेप केलेला नाही.

 

प्रश्न ४ : याचा अर्थ कोणत्याही सत्ताधारी व्यक्तीनंही तुमच्या तपासत हस्तक्षेप केला नाही? 

 

सचिन वाझे : हो

 

प्रश्न ५ : हे आरोपपत्र सादर करताना कोणत्याही प्रकारे गृह मंत्रालयाचा कधी संबंध आला होता का? 

 

सचिन वाझे : नाही

 

प्रश्न ६ : इतर कामात ग्रहमंत्रालयातून कधी ढवळाढवळ झाली होती का? तुम्हाला कधी पैशाबाबत ऑफर केली का ? 

 

सचिन वाझे : नाही

 

प्रश्न ७ : कधी गृहमंत्री यांना पैसे द्यायची वेळ आली होती का?

 

सचिन वाझे - नाही, माझ्यातर्फे नाही

 

प्रश्न ८ : तुम्ही कधी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पैसे दिलेत का? 

 

सचिन वाझे - नाही

 

प्रश्न ९ : तुम्ही अनिल देशमुख आणि त्यांच्या जवळच्या सहकार्यांना कधी पैसे दिलेत का? 

 

सचिन वाझे - नाही

 

प्रश्न १० : तुम्ही कुंदन शिंदे यांना ओळखता का? तुम्ही कुंदन शिंदे यांना कधी पैसे दिलेत का? 

 

सचिन वाझे : मला आठवत नाही

 

प्रश्न ११ : तुम्ही कुंदन शिंदे यांना काही दिल नाही म्हणून तुम्हाला काही आठवत नाही? 

 

सचिन वाझे : हो

 

प्रश्न १२ : अनिल देशमुख यांच्याकडील अधिकृत किंवा अनधिकृत व्यक्तींकडून तुम्हाला कधी काही निर्देश आले का? 

 

सचिन वाझे : नाही 

 

प्रश्न १३ : अनिल देशमुख यांच्या जवळच्या व्यक्तींनी कधी पैशांची डिमांड केली का? 

 

सचिन वाझे : नाही 

 

प्रश्न १४ : अनिल देशमुख यांच्याकडून तुम्हाला कधी कोणी बार आणि हाॅटेल मालकांकडून पैसे गोळा करा, असं सांगण्यात आलं होतं का? 

 

सचिन वाझे : मला आठवत नाही 

 

प्रश्न १५ : तुम्ही बार किंवा हाॅटेल मालकांकडून पैसे गोळा केलेत का?

 

सचिन वाझे : नाही 

 

दरम्यान यानंतर आता चांदिवाल आयोगापुढे 21 डिसेंबरला होणाऱ्या पुढील सुनावणीत सचिन वाझेची पुढची उलटतपासणी घेण्यात येईल. त्याआधी अनिल देशमुख यांना 16 डिसेंबर तर सचिन वाझेला 20 डिसेंबर रोजी आयोगापुढे हजर करण्याचे निर्देश जेल प्रशासनाला देण्यात आले आहेत.

 



इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha