Pench Tiger Reserve तोतलाडोह : नागपूर (Nagpur News) नजीकच्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील (Pench Tiger Reserve) तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई करण्यात आलीय. स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सच्या (STPF) पथकाने ही कारवाई केली असून यात दोन बोटीसह मासेमारी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य ही जप्त केलंय. 6 आणि 7 जुलै या दोन दिवसीय आयोजित केलेल्या विशेष मोहिमेदरम्यान स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स, तोतलाडोहने एकूण 165 मासेमारीच्या जाळ्यांसह दोन बोटी जप्त केल्या आहेत.


तोतलाडोह धरणात स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सची मोठी कारवाई


तोतलाडोह धरण मेघदूत जलाशयाचा एक भाग आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या अधिवास (Critical Tiger Habitat) असलेले प्रदेश आहे. या संपूर्ण परिसरात जैवविविधता राखण्यासाठी विशेष व्याघ्र संरक्षण दल महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतं. एसटीपीएफ (STPF) तोतलाडोहचे कार्य वन्यजीव संरक्षण कायद्यांची अंमलबजावणी आणि नैसर्गिक संसाधने जतन करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आले आहे. परिणामी, बेकायदेशीर मासेमारीच्या अवैध व्यवहारात गुंतलेल्या संबंधित गुन्हेगारांना रोखण्यासाठी आणि त्यांना जेरबंद करण्यासाठी हे दल रात्रंदिवस सतर्क राहून कडक गस्त ठेवते असते. दरम्यान, 6 आणि 7 जुलै रोजी दोन दिवसीय आयोजित केलेल्या विशेष मोहिमेत एसटीपीएफ पथकाला मोठे यश प्राप्त झाले आहे. मात्र मासेमारी करणारे आरोपी घटनास्थाळवरून पसार झाले आहे. सध्या त्यांचा देखील शोध एसटीपीएफ पथक घेत आहे.   


दोन बोटीसह मोठ्याप्रमानात मासेमारी साहित्य जप्त


एसटीपीएफ (STPF) तोतलाडोह पथकाने या तोतलाडोह धरणामधील मगर नाला आणि जामुन नाला भागात 6 जुलै रोजी सखोल शोध मोहिमेदरम्यान एक बोट, अंदाजे 120 मासेमारीची जाळी, दोन  ट्युब आणि एक सायकल जप्त केली. तर दुसऱ्या दिवशी,7 जुलैला मगर नाला परिसरात आणखी एका कारवाईत करत एक अतिरिक्त बोट, एक नळी आणि सुमारे 45 मासेमारीची जाळी जप्त करण्यात आली. 'हि जप्ती पेंच व्याघ्र प्रकल्पातील  तोतलाडोह धरणाच्या लगत असलेल्या परिसंस्थेचे रक्षण करण्याच्या आमच्या प्रयत्नांची आणि अतुलनीय समर्पणाचा पुरावा असल्याचे मत नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला यांनी बोलतांना व्यक्त केले. 


इतर महत्वाच्या बातम्या