एक्स्प्लोर

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षेच्या तारखा जाहीर; काही परीक्षा ऑफलाईन तर काही ऑनलाईन होणार

Mumbai University: सर्व विद्याशाखेच्या नियमित व बॅकलॉगच्या परीक्षा या ऑफलाईन घेण्याचा निर्णयही परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

Mumbai University: मुंबई विद्यापीठाने 2022 च्या प्रथम सत्राच्या उन्हाळी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या असून  19 एप्रिलपासून  परीक्षा  सुरु होत आहेत. यातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाईन तर पारंपारिक कला, वाणिज्य, विज्ञान व स्वयं अर्थसहाय्यीत अभ्यासक्रमातील सत्र 6 च्या (चॉईस बेस ) नियमित व बॅकलॉगच्या परीक्षा या ऑनलाईन व प्रात्यक्षिक परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे.

सत्र 6 च्या परीक्षा या विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या असतात, यानुसार या परीक्षांचा  निकालही वेळेवर जाहीर करणे आवश्यक असते. यावर विद्यार्थ्यांचे पुढील उच्च शिक्षण तसेच नोकरी अवलंबून असते. या परीक्षेचे निकाल वेळेवर जाहीर करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या एकूण लसीकरणाची संख्या तसेच कोकणातील एस.टी. महामंडळाच्या संपाची परिस्थिती, कोविडची परिस्थिती, वसतिगृहातील विद्यार्थ्यांची कमी उपस्थिती तसेच मुंबई विद्यापीठाचा भौगोलिक विस्तार, महाविद्यालयाची संख्या व विद्यार्थी संख्या तसेच पदवी परीक्षेचे अनेक विद्यार्थी परदेशी शिकण्यासाठी बाहेर जात असतात. त्यासाठी पदवीचे निकाल वेळेवर जाहीर करण्यासाठी पारंपारिक कला, वाणिज्य, विज्ञान व स्वयं अर्थसहाय्यीत पदवी अभ्यासक्रमातील सत्र 6 च्या (चॉईस बेस ) नियमित व बॅकलॉगच्या परीक्षा या ऑनलाईन घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे. मात्र सत्र 6 च्या परीक्षेतील प्रात्यक्षिक परीक्षा मात्र ऑफलाईन घेण्यात येणार आहेत.

2022 च्या हिवाळी सत्राच्या सर्व परीक्षा ऑफलाईन
2022-23 या शैक्षणिक वर्षाच्या 2022 च्या हिवाळी सत्राच्या सर्व विद्याशाखेच्या नियमित व बॅकलॉगच्या परीक्षा या ऑफलाईन घेण्याचा निर्णयही परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

पदवीच्या काही परीक्षा ऑफलाईन व काही ऑनलाईन
पदवीच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या सत्र 2 नियमित व बॅकलॉग परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील. तर सत्र 1, 3 व 5 बॅकलॉगच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येतील. सत्र 4 ची नियमित व बॅकलॉग परीक्षा ही ऑनलाईन घेण्यात येईल.

कला, वाणिज्य व विज्ञान पदव्यूत्तर परीक्षा ऑफलाईन
सत्र 2 व  4 नियमित व बॅकलॉग ह्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील.
सत्र 1 व 3 बॅकलॉगच्या परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.

ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येण्याऱ्या कला, वाणिज्य व विज्ञान पदवी व पदव्युत्तर परीक्षा या 50 टक्के बहुपर्यायी प्रश्न व 50 टक्के वर्णनात्मक प्रश्न या पद्धतीने घेण्यात येतील.

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाईन

  • व्यवस्थापन, तंत्रज्ञान व  आंतर-विद्याशाखेच्या परीक्षा ऑफलाईन व्यवस्थापनशास्त्र शाखेच्या सत्र 1 ते 4 नियमित व बॅकलॉग परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील.
  • अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर व एमसीए या वर्गाच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील.
  • शिक्षणशास्त्र पदवी परीक्षा सत्र 2 व 4 परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील. तर सत्र 1 व 3 बॅकलॉग ह्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतील.
  • आंतर-विद्या शाखेतील उर्वरित परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील.तसेच विधी शाखेच्या सर्व परीक्षा नियमित व बॅकलॉग ह्या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील.
  • मुंबई विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग व उपपरिसरे यांच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील. 2022 च्या प्रथम सत्र उन्हाळी परीक्षेचे वेळापत्रक परीक्षा विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय नाही, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय, सर्व सेवा बंद ठेवण्याचा इशारा
निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवर अद्याप ठोस निर्णय नाही, आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय, सर्व सेवा बंद ठेवण्याचा इशारा
पेसा कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश, नोकरी गमावण्याचं संकट टळले, आता प्रत्येक पेसा ग्रामपंचायतला एक पेसा मोबिलाईझर राहणार
पेसा कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश, नोकरी गमावण्याचं संकट टळले, आता प्रत्येक पेसा ग्रामपंचायतला एक पेसा मोबिलाईझर राहणार
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget