एक्स्प्लोर

अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील 158 परीक्षांचे मुंबई विद्यापीठामार्फत नियोजन

राज्य सरकारने निर्णय घेतल्याप्रमाणे केवळ अंतिम वर्षातील शेवटच्या सत्राची परिक्षा घेण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठामार्फत अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील 158 परीक्षांचे नियोजन करण्यात येत आहे.

मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्गमित केलेली मार्गदर्शक तत्वे आणि राज्य शासनाने गठीत केलेल्या समितीच्या शिफारशीवरून मुंबई विद्यापीठातर्फे पदविका, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील 158 परीक्षांच्या नियोजनासह शैक्षणिक वेळापत्रकासाठी कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रासाठी व वार्षिक परीक्षा पद्धतीनुसार 158 परीक्षांसाठी सुमारे 2 लाख 22 हजार 581 विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत.

या कृती आराखड्यान्वये ग्रेडींग पॅटर्न, एटीकेटी, दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील वार्षिक परीक्षा पद्धतीनुसार प्रविष्ठ झालेले विद्यार्थी, महाविद्यालयांच्या शंकांचे निरसन यासह अनुषंगिक बाबींचा सखोल अभ्यास करून सविस्तर मार्गदर्शक सूचना परिपत्रकान्वये लवकरच निर्गमित केल्या जाणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने निर्गमित केलेली मार्गदर्शक तत्वे आणि राज्य शासनाने गठीत केलेल्या समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठामार्फत तयार करण्यात येणाऱ्या कृती आराखड्यान्वये पदविका, पदवीपूर्व आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षातील अंतिम सत्राची परीक्षा घेताना सामाजिक अंतर, विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्य यांसह अनुषंगिक बाबींचा सखोल अभ्यास करुन परीक्षांचे नियोजन करण्यात येत असून त्याअनुषंगाने या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच विद्यापीठामार्फत जाहीर केले जाणार असल्याचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी सांगितले.

महाराष्ट्राने कोरोना बाधित रुग्णांचा 20 हजारांचा टप्पा ओलांडला; एका दिवसातील सर्वाधिक 48 मृत्यू

तसेच कोव्हिड-19 च्या उद्रेकामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा आणि त्यांच्या शैक्षणिक हितासाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी विद्यापीठामध्ये विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष आणि हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असून परीक्षांसाठी तसेच शैक्षणिक वेळापत्रकाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि सहाय्य मिळण्यासाठी जिल्हानिहाय समुपदेशनाची सोय लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. परीक्षा आणि शैक्षणिक वेळापत्रकाचे नियोजन करण्यासाठी कृती आराखडा तयार झाल्यावर महाविद्यालयांसाठी परीपत्रक, परीक्षांचे वेळापत्रक, आसनव्यवस्था, आणि विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे जाहिर केली जाणार असल्याचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.

#Corona Mumbai | मुंबईला कोरोनामुक्त करण्यासाठी स्पेशल-7 अधिकाऱ्यांची नियुक्ती, मुंबईची 7 झोनमध्ये विभागणी

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray On Sonam Wangchuk Protest: दृश्य काळजीत टाकणारी...सोनम वांगचुक यांच्यासाठी राज ठाकरेंची पोस्ट; म्हणाले, भाजपला कोणी प्रश्न विचारु नये असा माज
दृश्य काळजीत टाकणारी...सोनम वांगचुक यांच्यासाठी राज ठाकरेंची पोस्ट; म्हणाले, भाजपला कोणी प्रश्न विचारु नये असा माज
Shivraj Motegaonkar NEET Exam Paper Leak: नीटच्या पेपरचा 5 लाखात सौदा, शिवराज मोटेगावकरच्या फोनमध्ये सापडले केमिस्ट्रीचे 132 प्रश्न; CBIच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर
'नीटच्या पेपरचा 5 लाखात सौदा, शिवराज मोटेगावकरच्या फोनमध्ये सापडले केमिस्ट्रीचे 132 प्रश्न; सीबीआयच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर
Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Iran War Live Update: इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
High Court On BMC: उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे BMC ला आदेश
Gashmeer Mahajani On Pravin Tarde: '100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
'100 कोटींची मेहनत...', 'देऊळ बंद 2'च्या यशानंतर गश्मीर महाजनीची पोस्ट, प्रवीण तरडेंना टॅग करत म्हणाला...
Kandivali Crime: गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
गिफ्ट देण्याच्या बहाणा, डोळे बंद करायला लावले अन् प्रियकराने जागीच...; क्राइम पेट्रोल बघून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, कांदिवलीतील एकतर्फी प्रेमप्रकरणात धक्कादायक माहिती उघड
Beed Crime Vilas Ghule Case: बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; उमेश मानेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
Embed widget