एक्स्प्लोर
मुंबईत पार्किंग लिफ्टमधून कार कोसळली, दोन मृत्यूमुखी
मुंबई : मुंबईच्या आग्रीपाडा परिसरात 15 मजली इमारतीच्या पार्किंग लिफ्टमधून कार कोसळली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. इक्बाल हाईट्स या इमारतीत बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली.
कार लिफ्टमधून वर जाताना चालकाने चुकून अॅक्सिलेटर दाबला. त्यानंतर चालकाचा ताबा सुटला आणि लिफ्टचा दरवाजा तोडून कार दुसऱ्या मजल्यावरुन थेट जमिनीवर कोसळली. या घटनेत आठवीत शिकणारा हाफिज पटेल आणि चालक जावेद अहमद यांचा मृत्यू झाला आहे.
आठवीत शिकणारा हाफिज पटेल हा विद्यार्थी शेवटचा पेपर देऊन कारने घरी आला होता. त्यावेळी ड्रायव्हरने कार पार्किंग लिफ्टमध्ये नेली. कार दुसऱ्या मजल्यावर पोहोचली, मात्र त्याचवेळी चालकाचा पाय चुकून अॅक्सिलेटर पडला. यानंतर लिफ्टचा दरवाजा तोडून कार जमिनीवर कोसळली.
कुटुंबीयांना या घटनेची काहीच कल्पना नव्हती. हाफिज बराच वेळ घरी न आल्याने कुटुंबीयांनी जावेद अहमदला फोन केला. परंतु प्रतिसाद न मिळाल्या त्यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी जावेद अहमदच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस केलं असता ते इक्बाल हाईट्समध्येच आढळलं. यानंतर घराजवळ शोध घेतला असता, या घटनेचा उलगडा झाला. आग्रीपाडा पोलिस पुढील तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement