एक्स्प्लोर
'त्या' टॅक्सीचालकांविरोधात अभिनेता सुनिल शेट्टीची पोलिसात तक्रार
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टीने आपल्या ऑफिससमोरील काही टॅक्सीचालकांनी धमकावल्याची तक्रार पोलिसात केली आहे. मुंबईच्या वरळी भागात असलेल्या आपल्या ऑफिससमोरील काही टॅक्सीचालक डबल पार्किंग करत असल्याचा आरोप त्याने केला आहे. 'मुंबई मिरर'ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
वरळीत 'आनंद निवास' या आपलं ऑफिस असलेल्या इमारतीसमोर काही टॅक्सीचालक डबल पार्किंग करतात. त्याचप्रमाणे भेटीसाठी येणाऱ्या व्यक्तींनाही त्रास देतात, असा आरोप सुनिल शेट्टीने केला आहे.
काही टॅक्सीचालकांनी गेटसमोरच पार्किंग केलं होतं. आपण कार गेटमधून आत नेताना त्यांना बाजूला होण्यास सांगितल्यावरही त्यांनी हटण्यास विरोध केला. त्याचप्रमाणे कारमधून उतरुन चालत आत जा, असं उद्धट उत्तर दिल्याचा दावाही त्याने केला आहे. त्याच परिसरात टॅक्सीचालक पत्ते खेळत बसत असल्याचंही त्याने म्हटलं आहे.
शुक्रवारी घडलेला प्रसंग वर्णन करताना सुनिल शेट्टीने त्यावेळी 40-50 टॅक्सीचालक असल्याची माहिती दिली. आपल्या कारला गेटमध्ये शिरकाव करण्यासाठी जागा देण्याची विनंती केली असता त्यांनी पुन्हा मुजोरी केली आणि मारहाण करण्याची धमकी दिल्याचंही सुनिलने म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement