एक्स्प्लोर
शारीरिक संबंधांना नकार, 45 वर्षीय महिलेची सुरक्षारक्षकाकडून हत्या
शारीरिक संबंधांना नकार दिल्यामुळे 25 वर्षीय सुरक्षारक्षकाने घरकाम करणाऱ्या महिलेची हत्या केली.
मुंबई : मुंबईतील आरे कॉलनी भागात आढळलेल्या 45 वर्षीय महिलेच्या मृतदेहाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. शारीरिक संबंधांना नकार दिल्यामुळे 25 वर्षीय सुरक्षारक्षकाने घरकाम करणाऱ्या महिलेची हत्या केली.
गोरेगावमधील आरे कॉलनीतील झुडपांमध्ये सोमवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह आढळला होता. पतीच्या निधनानंतर संबंधित महिला परिसरात घरकाम करायची. तिच्या डोक्यावर आणि पाठीवर वार केल्याच्या खुणा होत्या.
हत्येप्रकरणी पोलिसांनी 25 वर्षीय सुरक्षारक्षकाला बेड्या ठोकल्या. तिघा मित्रांच्या मदतीने त्याने महिलेची हत्या केली. हत्येनंतर आरोपीने आरे कॉलनीतील जंगलात मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ऑटोप्सी रिपोर्टमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले का, हे स्पष्ट होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
पुणे
शेत-शिवार
Advertisement