एक्स्प्लोर

Dhananjay Munde | धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार महिलेने मागे घेतली आहे.

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेण्यात आली आहे. कौटुंबिक कारणं आणि या प्रकरणाचं राजकारण होत असल्याने तक्रार मागे घेत असल्याचं महिलेने म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केला होता. संबंधित महिलेने मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत यावर स्पष्टीकरण दिलं होतं. आपले करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत संबंध होते आणि या संबंधातून दोन मुले असल्याचा खुलासा त्यांनी केला होता.

या आरोपांनंतर एकच खळबळ उडाली होती. विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही याची गांभीर्याने दखल घेतली होती. परंतु पोलिसांच्या तपासात धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध काही सिद्ध झालं तरच पक्ष योग्य तो निर्णय घेईल. तोपर्यंत त्यांच्या राजीनाम्याची आवश्यकता नाही, असं पक्षाकडून सांगण्यात आलं होतं.

आता संबंधित महिलेने धनंजय मुंडे यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणं आणि या प्रकरणाचं राजकारण होत असल्याने गुन्हा दाखल करु नये अशी विनंती तिने पोलिसांकडे केली आहे. दरम्यान बलात्काराची तक्रार मागे घेतल्याने धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Sharad Pawar | धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर, पक्ष म्हणून निर्णय घ्यावा लागेल : शरद पवार 

मनसे, भाजपच्या नेत्यासह जेट एअरवेजच्या अधिकाऱ्याचा रेणू शर्मावर आरोप धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या या महिलेबाबत भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी खळबळजनक दावा केला होता. त्यानंतर या महिलेने ब्लॅकमेल केल्याचा दावा आणखी दोघांनी केला आहे. भाजप नेते माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी सदर महिलेने हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याचा प्रयत्न केल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली आहे. तर मनसे नेते मनीष धुरी आणि जेट एअरवेज कंपनीतील रिझवान कुरेशी या अधिकाऱ्याने देखील महिलेवर असाच आरोप केला आहे.

खोटे आरोप करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करा : चित्रा वाघ धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती. परंतु आता संबंधित महिलेने त्यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतल्यानंतर भाजपने खोटे आरोप करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अशाप्रकारामुळे ज्या महिला खरंच पीडित महिला आहेत त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलतो. सरकारी यंत्रणाचा बराच वेळ या प्रकरणात गेला. अशा प्रकारच्या आरोपांमुळे एखाद्याचं वैयक्तिक आयुष्यासह राजकीय जीनवही उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे खोटे आरोप करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.

हनी ट्रॅप ही महाराष्ट्राची संस्कृती नाही : सुप्रिया सुळे धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपाची सविस्तर चौकशी करावी अशी आमची आधीपासून मागणी होती. हनी ट्रॅप ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, हे अत्यंत वाईट आहे. कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर आपण बोलत नसतो. पण भाजपकडून यात राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

संबंधित बातम्या

कोणीही आरोप केले म्हणून राजीनामा घेणार नाही : जयंत पाटील

बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेचा आणि धनंजय मुंडेंचा जबाब मुंबई पोलीस नोंदवणार

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: धाराशिवमध्ये महायुती एकत्र सत्ता स्थापन करणार, अध्यक्ष भाजपचा तर उपाध्यक्ष पद शिवसेनेच्या वाटेला?
Maharashtra Live Blog Updates: धाराशिवमध्ये महायुती एकत्र सत्ता स्थापन करणार, अध्यक्ष भाजपचा तर उपाध्यक्ष पद शिवसेनेच्या वाटेला?
Maharashtra Goverment On LPG Cylinder Shortage: सिलिंडर नेणाऱ्या वाहनांना पोलिसांनी सुरक्षा द्यावी, कंट्रोल रुम बनवा...; राज्य सरकारच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
सिलिंडर नेणाऱ्या वाहनांना पोलिसांनी सुरक्षा द्यावी, कंट्रोल रुम बनवा...; राज्य सरकारच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
Stuti Sonawane Death Case Mumbai: अलिबागची ट्रिप, आंबट कँडी आणि छोटा बाथटब...; आयुष्य संपवण्याआधी मुंबईकर स्तुती काय काय म्हणाली?
अलिबागची ट्रिप, आंबट कँडी आणि छोटा बाथटब...; आयुष्य संपवण्याआधी मुंबईकर स्तुती काय काय म्हणाली?
पायी परिक्रमा करत असलेल्या जैन मुनींचा अपघातात मृत्यू, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घडली घटना
पायी परिक्रमा करत असलेल्या जैन मुनींचा अपघातात मृत्यू, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर घडली घटना

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेची आता सर्व देशांना रशियन तेल खरेदी करण्याची 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; चार वर्षात प्रथमच कच्च्या तेलाचा भाव 100 डॉलर्सच्या पार
अमेरिकेची आता सर्व देशांना रशियन तेल खरेदी करण्याची 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; चार वर्षात प्रथमच कच्च्या तेलाचा भाव 100 डॉलर्सच्या पार
Stock Market Today: शेअर बाजारात घसरगुंडी सुरूच; सेन्सेक्स 645 अंकांनी कोसळला, निफ्टीतही घसरण, गुंतवणूकदारांना मोठा झटका
शेअर बाजारात घसरगुंडी सुरूच; सेन्सेक्स 645 अंकांनी कोसळला, निफ्टीतही घसरण, गुंतवणूकदारांना मोठा झटका
Kavya Maran Abrar Ahmed The Hundred Leauge: पाकिस्तानच्या अबरारला संघात घेतलं, आता निवेदन जारी केलं; काव्या मारनचा संघ म्हणाला, बोली लावण्यासाठी...
अबरारला संघात घेतलं, आता निवेदन जारी केलं; काव्या मारनचा संघ म्हणाला, बोली लावण्यासाठी...
Kolhapur LPG Cylinder Shortage: कोल्हापुरात लग्न सुद्धा गेली गॅसवर, सिलेंडर मिळेनात, तब्बल तीन आमदारांच्या घरात सुद्धा मोठी लगीनघाई; जिल्हा पुरवठा अधिकारी नेमकं काय म्हणाल्या? कॅटरर्सना सुद्धा सूचना
कोल्हापुरात लग्न सुद्धा गेली गॅसवर, सिलेंडर मिळेनात, तब्बल तीन आमदारांच्या घरात सुद्धा मोठी लगीनघाई; जिल्हा पुरवठा अधिकारी नेमकं काय म्हणाल्या? कॅटरर्सना सुद्धा सूचना
भारतीय वंशाच्या दोन भावांना अमेरिकेत तब्बल 835 वर्षांची शिक्षा, कोर्टाने दोषी ठरवलं; नेमकं प्रकरण काय?
भारतीय वंशाच्या दोन भावांना अमेरिकेत तब्बल 835 वर्षांची शिक्षा, कोर्टाने दोषी ठरवलं; नेमकं प्रकरण काय?
Weather Alert: महाराष्ट्रावर दुहेरी संकट; एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे अवकाळी पाऊस झोडपणार, 72 तासांसाठी अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज
महाराष्ट्रावर दुहेरी संकट; एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे अवकाळी पाऊस झोडपणार, 72 तासांसाठी अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज
Buldhana Crime News: बुलढाणा हादरलं! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून अश्लील फोटोद्वारे ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉल करून विवस्त्र होण्याची अन् शरीर संबंधांसाठी धमकी
बुलढाणा हादरलं! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून अश्लील फोटोद्वारे ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉल करून विवस्त्र होण्याची अन् शरीर संबंधांसाठी धमकी
Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे 14 महिन्यानंतर जेल बाहेर; नेमकं कारण काय?
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे 14 महिन्यानंतर जेल बाहेर; नेमकं कारण काय?
Embed widget