Mumbai Rain | मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळीत
रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेवर विविध ठिकाणी ट्रॅकवर पाणी साचल्याने ठाणे ते मुंबई रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल सेवेवरही पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तर शासकीय कार्यालयांना मुभा देण्यात आली आहे.
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेवर विविध ठिकाणी ट्रॅकवर पाणी साचल्याने ठाणे ते मुंबई रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. मध्य रेल्वेवर सीएसएमटी-अंधेरी-गोरेगाव, ठाणे-कसारा, ठाणे-कर्जत-कसारा, हार्बर रेल्वेवर वाशी-पनवेल, ट्रान्स हार्बर रेल्वेवर ठाणे-वाशी-पनवेल रेल्वे सेवा सुरु आहे.
Due to very heavy rainfall, Central Railway Mumbai Suburban Services will run in following sections only till further notice:
Csmt andheri goregaon harbour line Vashi panvel harbour line Thane vashi Panvel transharbour 4th corridor to Kharkopar Thane kasara Thane karjat/khopoli — Central Railway (@Central_Railway) July 2, 2019
ठाणे-सीएसएमटी, वाशी-सीएसएमटी रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. तर ट्रान्स हार्बरवरील वाहतूक उशीराने सुरु आहे. पश्चिम रेल्वेची सेवा चर्चगेट ते वसई दरम्यान सुरु आहे. मात्र नालासोपारा दरम्यान पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर एसी रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
VIDEO | मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, शासकीय कार्यालयांनाही मुभा लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द पश्चिम रेल्वेवरील वांद्रे-वापी पॅसेंजर आणि वांद्रे-सूरत इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तर सूरत-विरार पॅसेंजर डहाणूपर्यंत चालविण्यात येत आहे. अहमदाबाद-मुंबई एक्सप्रेस वापीजवळ थांबविण्यात आली आहे.#WRUpdates 2/7/19.8.15 hrs. As water receded to some extent at Nallasopara,WR locals are being run with a frequency of 30 mins btwn Vasai https://t.co/14GNMTlc14 are running normal btwn Churchgate- Vasai Rd. AC local will not be run today. @drmbct @RailMinIndia @PiyushGoyalOffc
— Western Railway (@WesternRly) July 2, 2019
मध्य रेल्वेवरील मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन क्वीन, मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस, मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस, नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस, मुंबई-गडग एक्स्प्रेस, रत्नागिरी-दादर पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.@WesternRly Due to water logging at Nallasopara station following trains are cancelled & short terminated. pic.twitter.com/ukd9F1NA09
— DRM WR MumbaiCentral (@drmbct) July 2, 2019
CR Trains Update – 1 (cancellation and short termination on 2.7.2019 due to heavy rains)
Click linkhttps://t.co/awUQc64IUp — Central Railway (@Central_Railway) July 2, 2019