एक्स्प्लोर

मुंबईत पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग; पुढील 5 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, सतर्क राहण्याचं आवाहन

Mumbai Rain Updates : मुंबईत रात्रभर संततधार! मुंबईत पुढील 5 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, 7 आणि 8 जुलैला मुंबईत अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन

Mumbai Rain Updates : मुंबईत पावसाची (Mumbai Rain) नॉन स्टॉप बॅटिंग सुरुच आहे. मुंबईला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत आज काही ठिकाणी 200 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच, मुंबईत 7 आणि 8 जुलै रोजी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, रात्रभर कोसळत असलेल्या पावसामुळं अनेक सखच भागांत पाणी साचलं आहे.  

पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवेमध्ये दोन ते तीन फूट पाणी भरलं होतं. त्यामुळे अंधेरी सबवे वाहनांसाठी आणि इतर नागरिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. याशिवाय सायन, माटुंग्यातही काही प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या हिंदमातामध्ये मात्र अजिबात पाणी साचचेलं नाही. 

मुंबईत पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग; पुढील 5 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, सतर्क राहण्याचं आवाहन

सध्या मुंबई लोकल ट्रेन सुरळीत असून पश्चिम रेल्वे त्याचबरोबर मध्य रेल्वेची वाहतूकही सुरळीत आहे. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूकही सुरुळीत सुरु आहे. आज दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईत पुढील 5 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच आज आणि उद्या मुंबईत हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

मंगळवार, बुधवार असे दोन दिवस पावसानं मुंबईत जोरदार बॅटिंग केली. दिवसभर मुसळधार पाऊस मुंबईत कोसळल्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साठल्याचं पाहायला मिळालं होतं, याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेनं प्रत्येक वॉर्डमध्ये विशेष खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड या ठिकाणी देखील पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळत होता. हवामान विभागाकडून कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढील चार दिवसांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापुरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, नाशिक, पुण्यातही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आज दिवसभरातली परिस्थिती पाहता नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आव्हान हवामान खात्याच्या वतीनं करण्यात आलं आहे. 

काल (बुधवारी) झालेल्या मुसळधार पावसामुळं शहरातील काही भागांत पाणी साचल्यानं (Water Lodging) नागरिकांची मोठी गैरसोय झाली. काल दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळं सायनच्या रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. अंधेरी, घाटकोपर, चेंबूर, धारावी, दादर, वडाळा, पनवेलमध्येही लोक साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत घर गाठताना दिसले. पण संध्याकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यामुळं साचलेलं पाणी ओसरलं. पण रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळ पुन्हा सखल भागांत पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
Success Story : माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Annamalai : तमिळनाडूत भाजप प्रदेशाध्यक्ष अन्नामलाईंनी स्वत:ला चाबकाचे फटके का मारले?Special Report Chhatrapati Sambhajinagar : कमांडो भरतीची बोगस जाहिरात, तरुणांची फसवणूकSpecial Report Aditi tatkare On Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेमुळे शिक्षकांचे पगार उशीराने?Special Report : Suresh Dhas यांचे आरोप ,महायुतीमध्ये Dhananjay Munde एकाकी पडलेत?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, 3 जणांचा जागीच मृत्यू 
Success Story : माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
माढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 23 व्या वर्षी दोघीही  CA उत्तीर्ण, नेमकी कशी घातली यशाला गवसणी?
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
मोठी बातमी! सोलापुरात राहणाऱ्या 3 बांगलादेशी तरुणांना अटक, एजंटकडून काढली होती बनावट आधार कार्ड 
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
जगातील 10 सर्वात मोठे कर्जदार देश कोणते? भारताच्या तुलनेत अमेरिकेवर 10 पट कर्ज अधिक
Rohit Sharma : तर रोहित शर्माचा सुद्धा सिडनीत अश्विनसारखाच 'द एंड' अटळ? सुनील गावसकर थेट बोलले, तिकडं आगरकरही ऑस्ट्रेलियात पोहोचले!
तर रोहित शर्माचा सुद्धा सिडनीत अश्विनसारखाच 'द एंड' अटळ? सुनील गावसकर थेट बोलले, तिकडं आगरकरही ऑस्ट्रेलियात पोहोचले!
Pakistan on Manmohan Singh : पाकिस्तानमधील गाहमध्ये जन्म, पण भारताच्या 'अर्थक्रांती'चे शिल्पकार अन् पीएमही झाले; झेलमचा सुपूत्र मनमोहन सिंग यांच्या निधनावर पाकिस्तान काय म्हणाला?
पाकिस्तानमधील गाहमध्ये जन्म, पण भारताच्या 'अर्थक्रांती'चे शिल्पकार अन् पीएमही झाले; झेलमचा सुपूत्र मनमोहन सिंग यांच्या निधनावर पाकिस्तान काय म्हणाला?
Santosh Deshmukh Case : बीडमध्ये पावसाची वाणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
बीडमध्ये पावसाची वाणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
Mutual Fund SIP : 15000 रुपयांच्या दरमहा एसआयपीनं 15 कोटी रुपये किती वर्षात होतील? जाणून घ्या समीकरण
15000 रुपयांच्या दरमहा एसआयपीनं 15 कोटी रुपये किती वर्षात होतील? जाणून घ्या समीकरण
Embed widget