Mumbai Rain Update : मुंबई आणि परिसरात आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झालाय. दुपारी अडीच वाजता  मुंबई, ठाणे,  डोंबिवली आणि आजूबाजूला मुसळधार पाऊस झाला.  सकाळपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. परंतु, दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह पावसाला सुरूवात झाली.  डोंबिवलीमध्ये सकाळपासून 94.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर ठाणे,  मुंबई मध्य आणि पूर्व उपनगरात  अति तीव्र सरींची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. 






आज राज्यभरातच मुसळधार पाऊस झाला.  परंतु, मुंबई आणि परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.  मुसळधार पावसामुळे मुंबईतील अंधेरी सबवेमध्ये पाणी भरले होते. त्यामळे अंधेरी सबवे पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवे बंद झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.  शिवाय दादर, एलिफिन्स्टन आणि आसपास पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. आज सकाळी सात वाजल्यापासूनच  मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊल झाला. दुपारी साडेचार नंतर पावसाने थोडीफार उसंत घेतली. 






मुंबईत झालेला पाऊस
डोंबिवली 121.5 mm
ठाणे कल्याण 70-100 mm
मुंबई शहर 70-100 mm
पूर्व उपनगर 40-70 mm
 
राज्यात  पुढील पाच दिवस पावसाचेच 


दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार ते पाच  दिवसात राज्यात विजांच्या गडगडाटासह पाऊस पडेल. शिवाय या काळात सोसाट्याचा वारा वाहण्याची देखील शक्यता आहे.   






महत्वाच्या बातम्या


Maharashtra Rain : परतीच्या पावसाचा राज्यात धुमाकूळ, 'या' जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, शेती पिकांचं मोठं नुकसान