एक्स्प्लोर

Mumbai Rain : पहिल्याच पावसात मुंबईतील नालेसफाईची पोलखोल; आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका तर मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा

Mumbai Rain : मुंबईत मॅनहोलमध्ये उतरलेल्या दोन कर्मचाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला असून त्याची चौकशी झाली पाहिजे, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 

मुंबई : पहिल्याच पावसात मुंबईतील (mumbai rain update) नालेसफाईचा फज्जा उडाल्याचं चित्र असून अंधेरीसह इतर भागात कमरेपर्यंत पाणी साचल्याचं दिसून आलं. यावरुन आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी या संबंधित महापालिकेच्या अधिकाऱ्यावर कारवाईचा इशारा दिला आहे. 

देर आये दुरुस्त आये, या म्हणीप्रमाणे ओढ घेतलेल्या पावसाने शनिवारी मुंबईत जोरदार एन्ट्री केली आणि पहिल्याच पावसाने मुंबईची दाणादाण उडवली. मुंबईत ठिकठिकाणी पाणी साठलं होतं. पाण्याचा निचरा होत नसल्यानं मुंबईकरांना पाण्यातून वाट काढावी लागत होती. तर अनेक ठिकाणी गाड्या अडकल्या होत्या. 

मुंबईतल्या पहिल्याच पावसाने नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल केलीय. अंधेरी भागात झालेल्या पावसाने पाणीच पाणी अशी स्थिती रस्त्यावर झाली होती. पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की, लोकांना आधार देऊन सुरक्षित ठिकाणी घेऊन जावं लागत होतं. पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या एका महिलेला अशाच प्रकारे सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. काही चार चाकी वाहनांच्या टायरच्या लेव्हलपर्यंत पाणी आलेलं पाहायला मिळालं.

Aditya Thackeray On BMC : काय म्हणाले अदित्य ठाकरे?

मुंबईतील नालेसफाईवरीन आदित्य ठाकरेल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, मुंबईमध्ये काल अनेक ठिकाणी पाणी भरले. मुख्यमंत्री स्वतः नाल्यात उतरले, पण नालेसफाई झाली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबईकरांच्या प्रश्नाबाबत मुंबई मनपाने काळजी घ्यायला हवी होती. एका ठिकाणी इमारत कोसळली, लोकांच्या जीविताशी खेळ सुरू असून याची चौकशी झाली पाहिजे.  गोवंडीत मॅनहोलमध्ये उतरलेले दोन कामगार गुदमरून मेले, त्याला महापालिका प्रशासन जबाबदार आहे. या ठिकाणी तंत्रज्ञानाचा उपयोग करायला पाहिजे. अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून काम करायला पाहिजे, अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. नगरसेवक नाहीत म्हणून मॉनिटरिंग करण्यास कोणी नाही. त्यामुळे प्रशासक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. 

दरम्यान आज मुंबईसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर काही जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा, नाशिकमध्येही ही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगडमध्ये पुढचे सलग चार दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणाGangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special ReportZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget