मुंबईचा डब्बेवाला संकटात! 5000 पैकी फक्त 1500 डबेवाले शिल्लक
Mumbai Rain Live Updates : मुंबईत सध्या जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवक आणि शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी ठाकरे गटाला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
Mumbai Rain : मुंबईतील पावसाचा जोर ओसरला
मुंबईला आजसाठी प्रादेशिक हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी
दरम्यान, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा मुंबईत पावसाचा जोर बघायला मिळू शकतो
पालघर, ठाणे आणि रायगड परिसरात आज काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम
सिंधुदुर्गातील पावसाचा जोर देखील कमी झाल्याची माहिती
पूर्व विदर्भात आज मुसळधार पावसाचा इशारा, यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपुरसाठी आॅरेंज अलर्ट जारी
मराठवाड्यात देखील आजपासून कमी होणार
दरम्यान, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पाऊस कायम
Vasai Rains : वसई विरार आणि नालासोपारा शहरात काल दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचलं होतं. आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी, अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. शहरातील सखल भागात पाणी साचलेलं आहे. विरारचा विरार-बोलींज रस्ता, विवा कॉलेज रोड, एम.बी. इस्टेट, नालासोपारातील निळमोरे गांव, सेंट्रल पार्क, विजय नगर, आचोळे रोड, गास रोड, तसेच वसई पारनाका, डी.जी.नगर, सी कॉलनी, समता नगर इत्यादी सखल भागात पाणी साचलेलं आहे. पाण्यातून वाहन काढताना वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. तर आजही सलग अकराव्या दिवशी गास सनसिटी रोड पाण्याखाली आहे. काल सकाळी 8 ते आज सकाळी 8 वाजेपर्यंत वसई तालुक्यात 138 मीमी पाउस पडला आहे. दिवसभरात पावसाचा जोर वाढला तर सखल भागातील नागरिकांच्या घरातही पाणी शिरु शकते.
Mumbai News : मुंबईत काळ सकाळपासून मुसळधार पाऊस सुरg झाला आणि त्याच दरम्यान मुंबईच्या दिंडोशी पोलिसांना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास मोबाईलवर कॉल आला की, मुसळधार पावसामुळे दोन मुले अर्थव बिल्डिंग, न्यू म्हाडा कॉलनी, गोरेगावजवळील नाल्यात पडली. नाल्यातील पाण्याचा प्रवाह देखील वेगात होता. माहिती मिळताच दिंडोशी पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून दोन्ही मुलांना दोरीच्या मदतीने सुरक्षितपणे बाहेर काढले. वैद्यकीय उपचारानंतर दिंडोशी पोलिसांनी दोन्ही मुलांना त्यांच्या कुटुंबीयांकडे बोलावून सोबत पाठवले.
Mumbai Dam Water : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये सद्यस्थितीत 68.06 टक्के पाणीसाठा
सात धरणांपैकी चार धरणे पूर्ण क्षमतेने भरली
मोडक सागर, तानसा, विहार आणि तुळसी धरण ओव्हर फ्लो
Mumbai Rain : मागील 24 तासात कुलाब्यात 116 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सांताक्रुजमध्ये119 मीमी पावसाची नोंद झाली आहे.
Thane Rain : ठाणे शहरात आजही पावसाचा रेड अलर्ट जाहीर. सकाळपासूनच ठाणे शहरात ढगाळ वातावरण झाले असून पावसाचा वेग मध्येच कमी तर मध्येच जास्त होताना दिसून येतोय. ठाणे जिल्ह्यातील शाळांना अतिवृष्टीमुळे आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. व नागरिकांना महत्त्वाचे काम असल्यावरच बाहेर पडण्याचा सतर्कतेचा इशारा देखील प्रशासनाने दिला आहे.
पार्श्वभूमी
Mumbai Rain Live Updates : सध्या राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर कुठं पूरस्थिती देखील निर्माण झाली आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगर आणि ठाणे जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईत आज अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. तसेच मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
या भागात मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित झाली असून, वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुढील चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान खात्यानं वर्तवली आहे. दरम्यान, आज मुंबई महानगराला दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना आज (गुरुवार दिनांक 27 जुलै 2023) रोजी सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान आज मुंबईसह कोकण विभागाही मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंदुधुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आलाय. दुसरीकडे संपूर्ण विदर्भात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईत आज अति मुसळधार पावसाचा इशारा, शाळांना सुट्टी
मुंबईत आज अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. तसेच, सर्व मुंबईकर नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच रत्नागिरी, चंद्रपूर जिल्ह्यातील शाळांना देखील आज सट्टी जाहीर करण्या तआली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -