Maharashtra Monsoon Session: उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल

Mumbai Rain Live Updates : मुंबईत सध्या जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Aug 2023 04:52 PM
Uddhav Thackeray at Monsoon Session : उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल झाले आहेत. 

Monsoon Session: उपजाती ओबीसी समाजात घालून ओबीसी आरक्षण घालवण्याचा सरकारचा डाव : विजय वडेट्टीवार

Monsoon Session: रोहिणी आयोग म्हणजे ओबीसी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. माझ्या हातात अहवाल नाही माञ अनेक जाती आहेत ज्यांच्यामुळे  मूळ ओबीसीचा आरक्षण जाऊ शकतो, उप जाती ओबीसी समाजात घालून ओबीसी आरक्षण घालवणे हा या सरकारचा डाव आहे हा कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. 

Maharashtra Monsoon Session: विधिमंडळाचे अधिवेशन 4 ऑगस्टपर्यंत चालणार; आजच अधिवेशन संपणार असल्याची होती चर्चा
Maharashtra Monsoon Session : विधिमंडळाचे अधिवेशन पूर्वनियोजित वेळेनुसार 4 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. मात्र, कामकाजाला दोन दिवसांची अतिरिक्त सुट्टी देण्यात आली आहे. Read More
मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह परिसरात मुसळधार पाऊस

Mumbai Rains : मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय. हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट वर्तवलेला आहे, त्यानुसार मुंबईत अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आहे. त्यातच मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह परिसरात देखील हीच परिस्थिती आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस, चर्चगेट स्थानक ते मरीन लाईन स्थानकादरम्यान ट्रॅकवर पाणी

Mumbai Rain:  मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.  त्यामुळे मुंबईत अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं आहे, त्यातच मुंबईतील चर्चगेट स्थानक ते मरीन लाईन स्थानकादरम्यान ट्रॅकवर पाणी साचलेलं आहे. तसेच मरीन लाईन्स परिसरात अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक आणि रेल्वे ही संत गतीने धावत असल्याचे पाहायला मिळतेय. 

मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस, ठिकठिकाणी दृश्यमानता घटली; वाहन चालकांना करावा लागतोय अडचणींचा सामना

मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. पावसामुळे ठिकठिकाणी दृश्यमानता घटली आहे. सी-लिंक परिसरातील मुसळधारेमुळे वाहन धारकांना वाहनं चालवताना अडचणींचा सामना करावा लागतोय. सोबतच, वरळी, दादर, माहिम परिसर होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सी-लिंक परिसरातून दिसेनासे झाले आहेत. दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम राहिल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. 

Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" मालिकेच्या सेटवर दिसला बिबट्या; व्हिडीओ व्हायरल
एक बिबट्या "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) च्या सेटवर फिरताना दिसला. Read More
जोरदार पावसामुळं चर्चगेटच्या काही भागांमध्ये साचलं पाणी, वाहतुकीवर परीणाम

मुंबईत कालपासून मुसळधार पाऊस कोसळतोय.  त्यामुळे आज सकाळपासून चर्चगेटच्या काही भागांमध्ये पाणी भरलेलं पाहायला मिळतय.  त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडीही झालेली आहे. एवढं पाणी भरलं असताना महापालिकेचं सहकार्य नाही अशी तक्रार स्थानिक नागरिकांची पाहायला मिळतेय...

पावसाच्या रेड अलर्टमुळं ठाण्यातील अजित पवारांचा आजचा कार्यक्रम रद्द,

ठाण्यातील आजचा अजित पवार यांचा कार्यक्रम रद्द 


ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नवीन ऑफिस उद्घाटनाला येणार होते अजित पवार 


आजच्या रेड अलर्ट पार्श्व भूमीवर अजित दादा यांनी स्वतःहून कार्यक्रम केला रद्द


सरकारने सर्वांना घरी बसण्याचे आवाहन केले असताना मी स्वतः बाहेर पडणे योग्य दिसत नाही, पुढच्या वेळेस बघून कार्यक्रमाची डेट ठरवण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे

विविध भागातील मागील 24 तासातील पावसाची आकडेवारी (सकाळी 8:30 पर्यंत) 

मागील 24 तासातील पावसाची आकडेवारी (सकाळी 8:30 पर्यंत) 


रत्नागिरी - 200.5 मिमी 
नवी मुंबई - 104.8 मिमी 
माथेरान - 144.6 मिमी 
महाबळेश्वर - 179.6 मिमी 
सांगली - 36 मिमी 
कोल्हापूर - 23 मिमी

मुंबईत पावसाची संततधार सुरुच, दादर, माहिम, सायन, कुर्ला, वरळी, वांद्रे परिसरात पावसाच्या सरी 

मुंबईत पावसाची संततधार सुरुच 


दादर, माहिम, सायन, कुर्ला, वरळी, वांद्रे परिसरात पावसाच्या सरी 


मुंबईतील अनेक उंच इमारतींवर ढगांच्या दाटी


मुंबईत दुपारपर्यंत पावसाची संततधार सुरुच राहणार असल्याची प्रादेशिक हवामान विभागाची माहिती

मुंबईत पडणाऱ्या पावसाचा फटका सायन येथील डायलिसिस सेंटरला

Mumbai Rain : जनसामान्यांसाठी सुरू असलेल्या "मी मुंबई अभियान अभिमान प्रतिष्ठान या संस्थेतर्फे चालणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज डायलिसिस सेंटरच्या (सायन पूर्व) आवारात संततधार पावसामुळे पाणी शिरले आहे. सेंटरमधील काही उपकरणे व फर्निचर खराब झाले आहेत. याठिकाणी झालेल्या या नुकसानीमुळे मी व्यथित आहे. याठिकाणी रोज गरजू  ४०/५० जणांचे मोफत डायलिसीस उपचार होत असतात. 

सकाळपासूनच मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात

Mumbai Rain : मुंबईत रात्रभर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा सकाळी सहा वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. 

रात्रीच्या विश्रांतीनंतर मुंबईत सकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात

Mumbai Rains Update : मुंबईत रात्रभर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा सकाळी 6 वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

रात्रीच्या विश्रांतीनंतर मुंबईत सकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात

Mumbai Rains Update : मुंबईत रात्रभर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा सकाळी 6 वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

पार्श्वभूमी

Mumbai Rain Live Updates : सध्या राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. या पावसामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर कुठं पूरस्थिती देखील निर्माण झाली आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगर आणि ठाणे जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईत आज अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. तसेच मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.


या भागात मुसळधार पावसाचा इशारा


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित झाली असून, वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुढील चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान खात्यानं वर्तवली आहे. दरम्यान, आज मुंबई महानगराला दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना आज (गुरुवार दिनांक 27 जुलै 2023) रोजी सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान आज मुंबईसह कोकण विभागाही मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंदुधुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तर पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आलाय. दुसरीकडे संपूर्ण विदर्भात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


मुंबईत आज अति मुसळधार पावसाचा इशारा, शाळांना सुट्टी


मुंबईत आज अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. तसेच, सर्व मुंबईकर नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच रत्नागिरी, चंद्रपूर जिल्ह्यातील शाळांना देखील आज सट्टी जाहीर करण्या तआली आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.