एक्स्प्लोर

Mumbai Railway Accident: फुटबोर्डवर उभा राहून प्रवास, बॅगा एकमेकांना घासल्या गेल्या अन् आठजण खाली पडले, मुंबई रेल्वे अपघाताची स्टार्ट टू एंड स्टोरी

Mumbai Railway Accident: मुंबईत सोमवारी सकाळी भयानक रेल्वे अपघात घडला. दोन लोकल ट्रेनमधील प्रवाशी एकमेकांना धडकून ट्रेनमधून खाली पडले, पाच प्रवाशांचा मृत्यू

Mumbai Local Train Accident: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून काही अंतरावर झालेल्या रेल्वे अपघातात सोमवारी पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. मध्य रेल्वेमार्गावरील दिवा आणि मुंब्रा या स्थानकांदरम्यान सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला. दोन लोकल ट्रेन आजुबाजूने जास्त असताना या ट्रेन्सच्या दारात उभ्या असलेल्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला आणि त्यामुळे आठ जण रेल्वे ट्रॅकवर पडल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आज सकाळी साडेनऊच्या सुमारास मुंब्रा आणि दिवा या स्थानकांदरम्यान एक लोकल ट्रेन कसाऱ्याच्या दिशेने आणि दुसरी सीएसएमटीला जात होती. या दोन्ही लोकल ट्रेन आजुबाजूच्या ट्रॅकवरुन जात होत्या. या दोन्ही ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती. त्यामुळे अनेक प्रवासी फुटबोर्डवर उभे होते. यापैकी काही प्रवाशांच्या खांद्याला बॅगा लावल्या होत्या. ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी असल्याने हे प्रवासी ट्रेनमधून बाहेर आले होते. या दोन्ही लोकल ट्रेन एकमेकांच्या बाजूने जात असताना त्या वेगात होत्या. यावेळी काही प्रवाशांच्या बॅगचा धक्का दुसऱ्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांना लागला आणि फुटबोर्डवर काही इंच अंतरात पाय ठेवून उभे असलेले प्रवासी ट्रेनमधून खाली पडले, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली. हा अपघात साडेनऊ वाजता घडला. त्यानंतर 9.50 पर्यंत या प्रवाशांना रुग्णावाहिका आणून रुग्णालयात नेण्यात आले, अशी माहितीही मध्य रेल्वेच्या जनसंर्पक अधिकाऱ्यांनी दिली. 

या अपघातानंतर मध्य रेल्वेने आता भविष्यात ऑटोमॅटिक डोअरच्या गाड्या आणण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन गाड्यांमध्ये ऑटोमेटिक डोअर क्लोजर असेल. यामध्ये नव्या 238 गाड्यांचा आणि एसी लोकलचा समावेश असेल. तसेच सध्याच्या लोकल ट्रेनलाही दरवाजे लावण्याबाबतही विचार केला जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली. हा अपघात घडला तेव्हा दोन्ही लोकल ट्रकमधले अंतर दीड ते दोन मिटर इतके होते, अशी माहिती एका जखमी प्रवाशाने दिली.

Central Railway: अपघातानंतर मध्य रेल्वेचे महत्त्वाचे निर्णय

1. नवीन गाड्यांमध्ये ऑटोमेटिक डोअर क्लोजर असेल.

2. सध्याच्या लोकल ट्रेन्सनाही ऑटोमेटिक डोअर लावण्यासंदर्भात विचार केला जाईल.

3. कल्याण कसारापर्यंत तिसरी आणि चौथी  लाईन प्लान केली आहे. कुर्लापर्यंत आपण पाचवी आणि सहावी लाईन प्लॅन केलेली आहे.

4. ठाणे ते सीएसएमटी सहाव्या लाईनपर्यंत अपग्रेड करणार आहोत

5. कार्यालयांना देखील विनंती केली होती की, वेळेचे फरक केले तर चांगलं होईल.  काहींना आपण स्टॅगर्ट टाइमिंगसाठी कार्यालयांची विनंती आपण केली होती… ज्यात सकाळी १०, १०३०, ११ अशी कार्यालयीन वेळ केली तर अडचण येणार नाही 

6. पश्चिम आणि मध्य मध्ये अनेक गोष्टी वेगळ्या आहेत. मध्य रेल्वेची फ्रिक्वेन्सी अधिक आहेत, ब्रिज आणि टनेल अधिक आहेत मध्य रेल्वेवर त्यामुळे कम्पॅरिझन करणं बरोबर होणार नाही.

आणखी वाचा

सव्वा तास उलटला तरी रुग्णवाहिका नाही, मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनाही अपघाताचा थांगपत्ता नाही; पुष्पक एक्सप्रेसमधून ट्रॅकवर पडून 6 प्रवाशांचा मृत्यू

महत्त्वाच्या बातम्या

CM Devendra Fadnavis On Ramayana Movie: 'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भूरळ, नेमकं काय म्हणाले?
'रामायण' सिनेमाला ऑस्कर नाही मिळाला तर...; मुख्यमंत्र्यांनाही 'रामायण' सिनेमाची भूरळ, नेमकं काय म्हणाले?
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Devendra Fadnavis and Manoj jarange: मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Shivsena Party hearing in SC: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Symbol Case: : निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Shiv Sena Symbol Case:एकनाथ शिंदे आणि दोन सेना नेत्यांनी 'त्या' बैठकीत शिवसेनेची घटना बदलली, कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाला कोंडीत पकडणारा युक्तिवाद
एकनाथ शिंदेंकडून त्या बैठकीत सेनेच्या घटनेत बदल, कपिल सिब्बल तारीख सांगत म्हणाले...
Abhijeet Dipke: जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
जे कधी शाळेत गेले नाहीत ते सरकार चालवत आहेत, सरकारला फक्त हिंदू-मुस्लीम दिसतं, कोर्टातून पक्ष चोरले जात आहेत, त्यासाठी लगेच तारखा मिळतात; अभिजीत दिपकेंचा हल्लाबोल
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Embed widget