एक्स्प्लोर

मुंबईत पावसाची जोरदार हजेरी, पवई तलाव ओव्हर फ्लो

पवई तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरले जाते. गेल्या तीन दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे

मुंबई : मुंबईत मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा पवई तलाव आज (5 जुलै) पहाटे 6 वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. 545 कोटी लिटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरले जाते. गेल्या तीन दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे पवई तलाव भरल्याने औद्योगिक वापरासाठी पाणी उपलब्ध झाल्याने तेथे पाणी कपात होणार नाही. मात्र तलाव ओव्हर फ्लो झाल्याने तलावाचं पाणी मीठी नदी पात्रात जातं. त्यामुळे मीठी नदीची पाणी पातळी वाढणार आहे. त्यामुळे मीठी नदीच्या किनाऱ्यावर असणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका वाढला आहे.

पवई तलावाबाबत महत्त्वाची माहिती

या कृत्रिम तलावाचे बांधकाम 1890 मध्ये पूर्ण झाले. या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे 12.59 लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे 6.61 चौरस किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 2.23 चौरस किलोमीटर एवढे असते. तलावाची पूर्ण भरून वाहण्याची पातळी ही 195 फूट आहे. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये 545.5 कोटी लिटर पाणी असते. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.

Water logging in Mumbai | सलग तिसऱ्या दिवशी मुंबईत 'कोसळधार'; मुंबईतील रस्ते जलमय

महत्त्वाच्या बातम्या

'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
PMC Recruitment Scam : पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, तक्रार दाखल
पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, तक्रार दाखल
US Report China Pakistan : अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
Embed widget