मुंबई : मुंबईतील वाढते हवा प्रदूषण (Mumbai Pollution) सध्या चिंतेचा विषय बनला आहे. मुंबईत दिवसेंदिवस प्रदूषण वाढत असून नुकताच एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानुसार जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई शहर दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानातील लाहोर हे जगातील सर्वात जास्त प्रदूषित शहर आहे. 29 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यानची आकडेवारी आहे. तर देशातही दिल्लीला दुसऱ्या स्थानी ढकलत मुंबई पहिल्या स्थानावर
प्रदूषित शहरांत मुंबईचा दुसरा नंबर
स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्स IQAir नुसार मुंबईने भारतातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रीय राजधानी दिल्लीला मागे टाकले आहे. 29 जानेवारी ते 8 फेब्रुवारी आहे. दरम्यान मुंबई प्रदूषणाच्या बाबतीत जगात दुसऱ्या स्थानावर आहे. 29 जानेवारी रोजी, IQAir रँकिंगमध्ये मुंबई दहाव्या स्थानावर होती. या रॅंकिंगमध्ये सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत दिल्लीचा समावेश नाही. 13 फेब्रुवारी रोजी मुंबईने (Mumbai Pollution News) भारतातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून दिल्लीचा (Delhi) ताबा घेतला, त्यामुळे देशात मुंबईनंतर आता दिल्लीचा नंबर लागतो .
जगातील सर्वात प्रदूषित शहरं कोणती? (Polluted City In World)
1. लाहोर (पाकिस्तान)
2. मुंबई (भारत)
3. काबूल (अफगाणिस्तान)
4. काओशुंग (तैवान)
5. बिश्केक (किर्गिस्तान)
6. अक्रा (घाना)
7. क्राको (पोलॅंड)
8. दोहा (कतार)
9. अस्ताना (कझाकिस्तान)
10. सॅंटियागो (चिली)
मुंबईतील प्रदूषण नियंत्रण आणि हवेची गुणवत्ता नियंत्रित राहण्यासाठी दिल्ली (Delhi), गुरुग्राम, लखनौप्रमाणे एअर प्युरीफायर टॉवर मुंबई महानगरात देखील बसवण्यात यावेत. त्याचबरोबर शहरी वनीकरण वाढेल यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) बीएमसीला (BMC) दिल्या आहेत.
दिवसेंदिवस मुंबईतील हवा गुणवत्ता (Mumbai Air Quality) खालवत चालल्याने अनेकांना आरोग्याच्या समस्यांचा तोंड द्यावं लागत आहे. मुंबईत अनेक रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, घसा खवखवणे या सारख्या समस्या वाढल्या आहेत. अद्याप राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाकडून वाढत्या प्रदूषणावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. वाईट श्रेणीतील (Bad Air Quality) हवा असलेल्या ठिकाणी हृदय आणि फुफ्फुसाचे विकार बळवण्याचा अंदाज देखील तज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्याच्या काळात खासकरुन श्वसनाचे आजार असणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच मास्कचा (Mask) वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :