BEST Bus : यंदा राज्यात निर्बंधमुक्त महाशिवरात्री (Mahashivratri) साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सध्या जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान महाशिवरात्रीसाठी मुंबईतील (Mumbai) महत्वाच्या मंदिरांमध्ये भक्तांना दर्शनासाठी जाता यावं, यासाठी बेस्ट (BEST)  प्रशासनाने विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 


संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (Sanjay Gandhi National Park) कान्हेरी लेणी आणि दक्षिण मुंबईतील (South Mumbai) बाबुलनाथ मंदिरात जाण्यासाठी विविध ठिकाणाहून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रवेशद्वार ते कान्हेरी लेणी (Kanheri Caves) या मार्गावर सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेसात दरम्यान बसेस चालवण्यात येणार आहेत. तर बाबुलनाथ मंदिरात जाण्यासाठी सकाळी सात ते संध्याकाळी सात दरम्यान बससेवा चालवण्यात येणार आहेत. 






या मार्गांवर अतिरिक्त बस गाड्या


संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (Sanjay Gandhi National Park)  प्रवेशद्वार ते कान्हेरी लेणी बसमार्ग क्र. 188 या मार्गावर सहा अतिरिक्त बसगाड्या सकाळी 10.30 ते सायंकाळी 7.30 या दरम्यान चालवण्यात येणार आहे. तसेच बाबुलनाथ मंदिराकरता वाळकेश्वर ते प्रबोधनकार ठाकरे ( मार्ग क्रमांक 57), वाळकेश्वर ते अँटॉप हिल (Walkeshwar to Antop Hill)  (मार्ग क्रमांक 67) आणि वाळकेश्वर ते कुलाबा बस स्थानक (Walkeshwar to Kulaba)  (मार्ग क्रमांक 103) या मार्गांवर सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत सहा अतिरिक्त बस चालवण्यात येणार आहे. ही माहिती बेस्टने ट्वीट करत दिली आहे. 


बाबुलनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी


महाशिवरात्रीचा (Mahashivratri 2023) दिवस भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. दरवर्षी महाशिवरात्रीला शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी असते. मुंबईत प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरातही महाशिवरात्री साजरा करण्यासाठी भाविक गर्दी करतात. बाबुलनाथ मंदिर (Babulnath Temple) हे मुंबईतील (Mumbai) सुप्रसिद्ध शिवमंदिर असून, राजा भीमदेव यांनी हे मंदिर बाराव्या शतकात बांधले आहे. हे मंदिर काळाच्या ओघात जमीनदोस्त झाले होते. मात्र, 1780 साली मंदिराचे काही अवशेष आढळून आल्याने त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Mahashivratri 2023: महाशिवरात्रीला महादेवाला बेलपत्र अर्पण केल्याने काय होते? ज्योतिषतज्ज्ञांकडून जाणून घ्या