(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उच्च शिक्षित प्रेमप्रकाश कसा झाला ड्रग्ज डिलर, मुंबईत कसं उभारलं गुन्ह्याचं साम्राज्य?
Mumbai : मुंबईतील दहिसर परिसरात राहणारा प्रेमप्रकाश पारसनाथ सिंह ड्रग्ज डिलर कसा झाला. उच्च शिक्षण घेतलेल्या सिंहचा एक सामान्य माणूस ते ड्रग्ज विक्रेता हा प्रवास जाणून तुम्ही थक्क व्हाल.
Mumbai police seized 700 kg drugs : मुंबई पोलिसांनी गुरुवारी तब्बल 700 किलो वजनाचे 1400 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त केले होते. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतलं. यामध्ये उच्च शिक्षित प्रेमप्रकाशचाही समावेश आहे. मुंबईतील दहिसर परिसरात राहणारा प्रेमप्रकाश पारसनाथ सिंह हा 52 वर्षाचा व्यक्ती एक मोठा ड्रग्ज डिलर कसा झाला. उच्च शिक्षण घेतलेल्या सिंहचा एक सामान्य माणूस ते ड्रग्ज विक्रेता हा प्रवास जाणून तुम्ही थक्क व्हाल. प्रेमप्रकाश सिंहने कसं उभ केलं हे गुन्हाचं साम्राज्य, पाहूयात...
मुंबई पोलिसांच्या तावडीत आलेला या आरोपीच नाव आहे प्रेमप्रकाश पारसनाथ सिंह, त्याच्यावर 1400 कोटी अंमलीपदार्थ बनवणून मुंबईमध्ये एक मोठं ड्रग्ज रॅकेट चालवण्याचा आरोप आहे. सर्वसामन्य घरात जन्मलेला उच्च शिक्षित सिंह याने आपल्या शिक्षणाचा वापर चूकीच्या कामात केला आणि आज पोलिसांच्या तावडीत पोहचला. सिंहने मुंबई बाहेर ड्रग्ज फॅक्टरी उभी केली आणि तिथ तब्बल 700 किलो मेफेड्रॉन बनवून बाजारात विकण्यासाठी एक टोळी उभी केली. सिंहने आपल्या गुन्हाची जेव्हा कबूली दिली तेव्हा पोलीस देखील त्याचा प्रवास एकून चकित झाले.
1992 मध्ये सिंह यांनी उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील पूर्वांचल विद्यापीठातून रासायनिक शास्त्रामध्ये आँरगेनिक केमिस्ट्रीचे शिक्षण पूर्ण केले. 1997 मध्ये सिंह मुंबईत आला आणि नालासोपारा येथे राहू लागला. सुरुवातीच्या काळात त्यांने छोट्या कंपन्यांमध्ये फार्मास्युटिकलचं काम सुरू केलं. कामातून मिळणाऱ्या पैशाने सिंह खूष नव्हता. त्यामुळे त्याने काही वर्षात नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला. जवळपास 7-8 वर्ष फार्मास्युटिकल उत्पादनांचे फॉर्म्युलेशन आणि मार्केटिंग व्यवसाय केला. त्यानंतर केमिकल प्रक्रीया संदर्भात त्याला बराच अभ्यास झाला आणि एक दिवस मेफेड्रॉन बनवण्यासाठी एका व्यक्तीने त्याला संपर्क केला आणि इथेच गुन्हा जगतात त्याचं पहिलं पाऊल पडलं.
त्या काळात मेफेड्रॉनला (MD) प्रचंड मागणी होती. 2019 मध्ये त्याने संधी साधून वेगवेगळे केमीकल एकत्रित करून त्यावर रासायनिक प्रक्रिया केली आणि एम.डी नावचं अंमली पदार्थ तयार करण्यात तो यशस्वी झाला. असं म्हंटलं जात सिंह तयार केलेली एमडी ड्रग्ज ही खूप चांगल्या क्वालिटीची होती, त्यामुळे बाजारात सिंहच्या ड्रग्जला खूप डिमांड होती. सिंह हा काही मोठ्या ड्रग्ज माफियांच्या संपर्कात आला आणि त्याने मुंबई बाहेर अंबरनाथ, नालासोपारा इथं ड्रग्ज फॅक्टरी उभी केली. या फॅक्टरीमधून पोलिसांना एकूण 700 किलोग्रॅम वजनाचा व रुपये 1400 कोटी किमंतीचा एम.डी. अंमलीपदार्थ मिळाले. नालासोपारा परिसरातील गोडाऊन मधून पोलिसांनी अंमली पदार्थ जप्त केलं आणि सिंहसोबत पाच जणांना अटक ही केली. शमशुल्लाह खान, आयुब शेख, रेश्मा संजयकुमार चंदन, -आयुब इजहार अहमद शेख या चार आरोपींनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
झटपट पैसा कमावण्याच्या लालसेपोटी तो ड्रग्ज बनवू लागला. हाय क्वालिटी ड्रग्ज बनवून तो आपल्या पेडलर्स मार्फत शहरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये विकू लागला. पण अखेर मुंबई गुन्हे शाखेच्या अमंली पदार्थ विरोधी कक्षाने या उच्च शिक्षित ड्रग्ज माफियाचा बंदोबस्त केला. अंमली पदार्थ विकून बेकायदेशीरपणे पैसे कमवून सिंहने एका वर्षातच दहिसरमध्ये आलीशान घरासह मोठी मालमत्ता विकत घेतली. त्याच्या जीवनात होत असलेले मोठे बदल पाहून त्याचे कुटुंबातील सदस्य त्याच्यावर संशय घेऊ लागेल, पण तो त्यांच्याशी खोटे बोलत राहिला. पण आखेर त्याचा खरा चेहरा हा सर्वांसमोर आलाच. मुंबई पोलीस याच्या संपर्कात असलेले ड्रग्ज माफीयांचा ही शोध घेत आहेत, ज्यांनी इतक मोठं साम्राज्य उभ करण्यासाठी सिंहला पैसै दिले..