Mumbai Police : नवी मुंबई पोलिसांनी एक कोटी 55 लाखा रूपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी जप्त केलेला मेथॅक्यलॉन हा अमली पदार्थ घातक असल्याची माहिती मिळाली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने ही कारवाई केली आहे. समसदिन अजिजल्लाह शेख आणि राजेंद्र उर्फ बराकी मारुती पवार असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींचे नावे आहेत.


नवी मुंबई पोलिसांनी या कालवाईत एक कोटी 55 लाख 27 हजार शंभर रुपयांचा एक किलो 550 ग्रॅम  मेथॅक्यलॉन हा घातक अमली पदार्थ जप्त केला आहे. याबरोबरच या कारवाईत पोलिसांनी 30 लाख रूपये किंमतीची एक आलिशान गाडीही जप्त केली आहे.  


 एक संशयित गाडी 30 मार्च रोजी किल्ला गावठाण परिसरात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग सोनावणे यांना मिळाली होती. संबंधीत परिसरात तत्काळ पथक पाठवून शोध मोहीम हाती घेतली असता संशयित गाडी पोलिसांच्या नजरेस पडली. उरण फाट्याकडून किल्ला जंक्शनकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकता विहार सोसायटी समोरील बस थांब्या जवळ ही संशयित गाडी पोलिांना आढळून आली. गाडीतील दोघांची चौकशी केली केली असता संशयितांकडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. पोलिसांनी गाडीसह आरोपींना पोलीस ठाण्यात आणून झाडाझडती घेतली. या वेळी त्यांच्याकडे पावडर सारखा एक   पदार्थ आढळून आला. त्याची पडताळणी केली असता तो मेथॅक्यलॉन हा घातक अमली  पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोघांनाही अटक करण्यात आली. 


संशयित आरोपी समसद्दीन याच्याकडे 90 लाख रूपये किमतीचा मेथॅक्यलॉन हा घातक अंमली  पदार्थ पावडरच्या रूपात आढळून आला. तर अकराशे रूपयांची रोक्कड आणि 30 लाखांची गाडी, पाच हजर रूपयांचा मोबाईल आणि 500 रुपयांचा साधा मोबाईल आढळून आला. दुसरा संशयित आरोपी राजेंद्र याच् कडे 65 लाख रूपयांच्या मेथॅक्यलॉन  अंमली  पदार्थसह पाचशेशी रोकड आणि 20 हजर रूपयांचा मोबाईल आढळून आला.


दरम्यान, अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींवर या पूर्वी गुन्हा नोंद आहे का? एवढ्या मोठ्या प्रमाणात मेथॅक्यलॉन हा घातक अंमली  पदार्थ कोणासाठी आणला होता की, स्वतःच थेट ग्राहकाला विक्री करण्यासाठी आणला होता का? आणि तो कोठून आणला? याची माहिती घेण्याचे काम पोलीस करत आहेत.  


महत्वाच्या बातम्या


Mumbai Mega Block: रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक, येथे पाहा संपूर्ण वेळापत्रक


Mumbai Metro : मेट्रोच्या उद्धाटनाच्या आधी शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई; देवेंद्र फडणवीसांना निमंत्रणच नाही


Sanjay Raut : भाजपकडून महाराष्ट्रात अतिरेक्यांसारखी कारवाया; संजय राऊत यांचा हल्लाबोल