Sunday Mega Block: मध्य रेल्वे मुंबई विभाग दिवा स्थानकावरील जुनी रूट रिले इंटरलॉकिंग इमारत पाडून आणि अप आणि डाऊन जलद मार्ग स्लीव्हिंगचे काम, ओएचई स्लीव्हिंग आणि क्रॉस ओव्हर पॉइंटच्या कामासाठी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक ठेवण्यात आलं आहे. 


ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 09.00 ते रात्री 09.00 पर्यंत मेगाब्लॉक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी 07.55 ते संध्याकाळी 07.50 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल मुलुंड/ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या निर्धारित थांब्यानुसार स्थानकावर थांबतील आणि निर्धारित वेळेच्या 10 ते 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. तर, सकाळी 08.30 ते रात्री 09.12 पर्यंत कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद लोकल कल्याण आणि ठाणे/मुलुंड स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. निर्धारित थांब्यानुसार स्थानकावर थांबतील आणि निर्धारित वेळेच्या 10 ते 15 मिनिटे उशिरा धावतील.
 
ब्लॉक कालावधीत मेल/एक्स्प्रेस गाड्यांची धावण्याची स्थिती 
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथून सुटणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान 5व्या मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 15 ते 20 मिनिटे उशिराने पोहोचतील.ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादरला येणार्‍या मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण ते ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान 6व्या मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 15 ते 20 मिनिटे उशिरा पोहोचतील. या विशेष मेगाब्लॉकमुळं होणाऱ्या गैरसोयीबाबत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. पायाभूत सुविधांच्या सुधारणांसाठी हे विशेष ब्लॉक आवश्यक आहेत. 


 रेल्वे प्रशासनाचं प्रवाशांना आवाहन
पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक असून प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.तसेच या कालावधीत प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबाबत प्रशासनानं दिलगिरी व्यक्त केलीय. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha