मुंबई : राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.  पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत ही जमावबंदी लागू आहे. 27 मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू होणारे हे निर्बंध 15 एप्रिलपर्यंत लागू असणार आहेत.  मुंबईत जमावबंदीचे पालन काटेकोरपण केलं जात आहे. रात्री मुबंईत ठिकठिकाणी पोलीस तैनात होते. 


राज्यात जमावबंदी लागू झाल्यानंतर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. मुंबईत देखील नाईट कर्फ्यू लागू झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून अनेक ठिकाणी रात्री नाकाबंदी करण्यात आली आहे. रात्री विनाकारण फिरणाऱ्यांवर तसेच रॅश ड्राईव्हिंग करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांना घरी परतण्याचं आवाहन केलं जात होते. 


राज्य सरकारचं Mission Begin Again; रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदी


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोणते निर्बंध लागू आहेत?



  •  27 मार्च 2021च्या मध्यरात्रीपासून हे नियम लागू असतील. ज्याअंतर्गत रात्रीच्या जमावबंदीमुळं रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत पाचहून अधिकजणांना एकाच ठिकाणी जमण्यास बंदी असेल. नियमांचं उल्लंघन झाल्यास प्रत्येक व्यक्तीकडून 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येईल.

  • उद्यानं, समुद्रकिनाऱ्यांसह सर्व सार्वजनिक ठिकाणं रात्रीच्या जमावबंदीमुळं रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत बंद असतील किंवा या ठिकाणांवर प्रवेश निषिद्ध असेल.

  • मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीकडून 500 रुपये आणि रस्त्यात थुंकणाऱ्या व्यक्तीकडून 1000 रुपयांचा दंड आकारला जाईल. 

  • सर्व मॉल्स, सिनेमागृह, सभागृह, कार्यक्रम स्थळं, रेस्तराँ रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत बंद असतील. होम डिलीव्हरीसाठी मात्र निर्बंध नाही.

  • कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येऊ नये. कोणत्याही कार्यक्रमस्थळी असं आयोजन केल्याचं आढळून आल्यास सदर ठिकाणाला प्रदीर्घ काळासाठी टाळे ठोकण्यात येईल.

  • लग्नसोहळ्यासाठी 50हून अधिक पाहुण्यांची उपस्थिती कायदेशीर कारवाईस पात्र असेल. याशिवाय विवाहस्थळही पुढील आदेशांपर्यंत बंद करण्यात येईल.

  • अंत्यविधींसाठी 20 लोकांचची उपस्थिती असणं अपेक्षित. स्थानिक यंत्रणांची याबाबतची काळजी घ्यावी. 


Maharashtra Coronavirus: राज्यात कोरोनाचा उद्रेक! आज तब्बल 40 हजार 414 कोरोना बाधित रुग्णांची नोंद