मुंबई : अँटिलीया प्रकरणात चौकशीसाठी एनआयए रविवारी सचिन वाझे यांच्यासमवेत मिठी नदीवर पोहोचली. एनआयएला नदीतून नंबर प्लेट आणि डीव्हीआय यासह अनेक पुरावे सापडले आहेत. डीव्हीआर नष्ट करुन तो नदीत फेकला गेल्याचा संशय आहे. नदीतून दोन सीपीयू आणि एक हार्ड डिस्क डायव्हर्स सापडले आहेत. दोन नंबर प्लेट्स सापडल्या असून दोन्हींवर एकच नंबर लिहिलेला आहे.

Continues below advertisement


नदीतून एनआयएला काय मिळाले?



  • हार्ड डिस्क

  • दोन सीपीयू

  • नंबर प्लेट

  • एक प्रिंटर

  • एक लॅपटॉप


सूत्रांच्या माहितीनुसार, माहिती मिळाल्यानंतरच तपास एजन्सीने पाण्यात शोध सुरु केला. या सर्व गोष्टी अँटिलिया आणि मनसुख हिरण प्रकरणाशी संबंधित असल्याचा तपास एजन्सीचा दावा आहे.


सचिन वाझे 3 एप्रिलपर्यंत एनआयएच्या ताब्यात


उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळील वाहनात जिलेटिनच्या कांड्या आढळल्याच्या संदर्भात अटक केलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे 3 एप्रिलपर्यंत एनआयएच्या ताब्यात आहेत. यापूर्वी सचिन वाझे यांना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली होती. जी 3 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. एनआयएने 13 मार्चला सचिन वाझे यांना अटक केली आहे.




याअगोदर 25 मार्चला संध्याकाळी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सचिन वाझे यांना घेऊन ठाण्यातील रेती बंदर खाडी येथे तपास केला होता. तेथे व्यापारी मनसुख हिरण याचा मृतदेह सापडला होता. मनसुख हिरण यांच्या हत्येमागे सचिन वाझे यांचा हात असल्याचा आरोप हिरण यांच्या पत्नीने केला आहे.