एक्स्प्लोर

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' भागात उद्या पाणी बंद!

Mumbai News: ज्या भागातील पाणीपुरवठा आज बंद ठेवण्यात आला आहे, तेथील नागरिकांना पाणी जपून आणि काटकसरीनं वापरण्याचं आवाहन मुंबई महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे.

Water Cut in Mumbai : मुंबईकरांसाठी (Mumbai News) मोठी बातमी. मुंबईकरांना (Mumbai Water Cut) पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) करण्यात आलं आहे.   पवई येथे आरे वसाहतीजवळच्‍या गौतम नगर परिसरात  जलवाहिनी दुरुस्तीसाठी  एच पूर्व, के पूर्व, जी उत्तर आणि एस विभागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.  काही ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. संबंधित भागातील नागरिकांनी याची नोंद घेऊन पाणी काटकसरीने वापरावे व महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

पवई येथे आरे वसाहतीजवळच्‍या गौतम नगर परिसरात 1800 मिलीमीटर व्यासाच्‍या तानसा (पश्चिम) मुख्य जलवाहिनीवर शुक्रवारी दुपारी 1 च्‍या सुमारास  मोठी गळती लागल्‍याचे आढळून आले. त्‍याची माहिती मिळताच, सहायक अभियंता नगर बाह्य (प्रमुख जलवाहिन्‍या) विभागाच्‍या अधिकारी, कर्मचारी, कामगारांनी तात्‍काळ तेथे जाऊन जलवाहिनीवरील झडप बंद करून पाणी गळती बंद केली. तानसा (पश्चिम) जलवाहिनीचा पाणीपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात बंद करून दुरुस्ती कामदेखील युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे.  सुमारे 24  तास हे काम सुरू राहण्‍याची शक्यता आहे. अचानक झालेल्या या गळतीमुळे एच पूर्व, के पूर्व, जी उत्तर आणि एस विभागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. 

के पूर्व विभाग

  •  प्रकाशवाडी, गोविंदवाडी, मालपा डोंगरी 1/2, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगतसिंग वसाहत  , मुकुंद रुग्णालय, टेक्निकल परिसर, इंदिरा नगर, मापकंद नगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग, चिमटपाडा, सानबाग, मरोळ, एम. आय. डी. सी. परिसर, रामकृष्ण मंदीर मार्ग, जे. बी. नगर, बागरखा मार्ग, कांती नगर (पाणीपुरवठा बंद राहील)
  • सहार रोड, कबीर नगर, बामणवाडा, पारशीपाडा, विमानतळ वसाहत, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, दौलतवाडी, पी. एन. टी. वसाहत (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी 2 ते सायंकाळी 5.30) (पाणीपुरवठा बंद राहील)
  • मिलिटरी मार्ग, विजय नगर, मरोळ-मरोशी मार्ग  (पाणीपुरवठा बंद राहील)
  •  मुलगाव डोंगरी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम. आय. डी. सी.) मार्ग क्रमांक 1 ते 23, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडिविटा, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, वाणी नगर, दुर्गापाडा, मामा गॅरेज  (पाणीपुरवठा बंद राहील)
  • ओम नगर, कांती नगर, राजस्थान गृहनिर्माण संस्था, साईनगर, सहार गांव, सुतार पाखाडी, कार्गो संकुल (पाणीपुरवठा बंद राहील)

एच पूर्व विभाग

  • वांद्रे रेल्वे टर्मिनस परिसर, बेहरामपाडा  (पाणीपुरवठा बंद राहील)

जी उत्तर विभाग

  •  धारावी  (पाणीपुरवठा बंद राहील)

एस विभाग

  •  गौतम नगर, जयभीम नगर    (पाणीपुरवठा बंद राहील)
  •  फिल्टरपाडा, बेस्ट सर्कल, गावदेवी, इस्लामिया चाळ  (पाणीपुरवठा कमी दाबाने राहील)
  •  पठाणवाडी, महात्मा फुले नगर (पाणीपुरवठा कमी दाबाने राहील)
  • कैलास नगर, पासपोली गाव, निटी परिसर, अमृत हॉटेल लगतचा परिसर  (पाणीपुरवठा कमी दाबाने राहील)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget