एक्स्प्लोर

वरळीत लिफ्ट कोसळून दोन जणांचा मृत्यू, एका आठवड्यात मुंबईत दुसरी घटना

Mumbai News Update : मुंबईतील वरळीत लिफ्ट कोसळून दोन जणांचा मृत्यू झालाय. एका आठवड्यात मुंबईतील ही दुसरी घटना आहे.

मुंबई : विक्रोळी येथे लिफ्ट कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज वळीत देखील अशीच एक घटना घडलीय. वरळीत लिफ्ट कोसळून दोन जणांचा मृत्यू झालाय. वरळीतील अविघ्न हाऊस मायानगर येशील इमारतीत ही घटना घडलीय. 19 मजल्याची ही इमारत असून पोलिस आणि फायर ब्रिगेडचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. इमारतीच्या आवारात लिफ्ट कोसळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.  
 
मिळालेल्या माहितीनुसार 19 मजली या इमारतीचं बांधकाम पूर्ण झालं होतं. परंतु, लिफ्ट बसवण्याचं काम सुरू होतं. त्याचवेळी ही घटना घडली आहे. लिफ्टमध्ये आणखी काही लोक अडकले आहेत की नाही याबाबत अद्याप माहिती मिळालेली असून पोलिसांनी घटनास्थळी मदत कार्य सुरू केलं आहे. 

अशी घडली घटना 

वरळीतील अविघ्न टॉवरमध्ये दोन व्यक्ती लिफ्ट ट्रॉलीच्या सहाय्याने काच पुसण्याचं काम करत असताना लिफ्ट कोसळली. यावेळी या लिफ्ट ट्रॉलीवर काम करत असलेले दोघे जण सोळाव्या मजल्यावरून लिफ्टसह खाली कोसळले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी दोघांनाही तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, उपचारदर सुरू असताना दोघांचाही मृत्यू झाला. 

आठवड्यातील दुसरी घटना 

लिफ्ट कोसळून कामगारांचा मृत्यू होण्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. या पूर्वी 4 जानेवारी 2023 रोजी मुंबईतील विक्रोळी येथील सिद्धिविनायक सोसायटीची पार्किंग लिफ्ट कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला होता. शिवम जैस्वाल असं मृत्यू झालेल्या कामगाराचं नाव होतं. लिफ्टचा ढाच्या कोसळल्यानंतर जैस्वाल यांना दीड तासांनंतर त्यातून बाहेर काढण्यात आले होते. परंतु, जैस्वाल हे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  
 
विक्रोळी येथे  श्री सिद्धिविनायक को-ऑपरेटिव्ह या सोसायटीची 23 माळ्यांची इमारत आहे. या सोसायटीच्या पार्किंग लिफ्टचे काम सुरू होते. काम सुरू असतानाच पार्किंग लिफ्टचा ढाचा 23 व्या मजल्यावरून खाली कोसळला. यावेळी चार कामगार लिफ्टचे काम करत होते. त्यावेळी यातील एका कामगाराचा मृत्यू झाला होता. तर दोघांना बाहेर काढण्यात यश आले होते. दरम्यान, श्री सिद्धिविनायक को-ऑपरेटिव्ह या सोसायटीचे बांधकाम हे अनधिकृत करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला होता. परवानगी नसताना इमारतीच्या लिफ्टचे बांधकाम सुरू होते. आम्ही याबाबतचे स्ट्रक्चर देखील मागण्याचा प्रयत्न केला. परंतु, आम्हाला याबातची कोणतीच माहिती देण्यात आली नाही. याबाबत आम्ही तक्रारी देखील केल्या आहेत असे स्थानिकांनी म्हटले होते. 

महत्वाच्या बातम्या

मुंबईमधील विक्रोळी येथील सिद्धिविनायक सोसायटीची लिफ्ट कोसळली, एका कामगाराचा मृत्यू  

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
अजितदादांना न्याय कधी मिळणार? राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं आंदोलन, सूरज चव्हाणांसोबत बाचाबाची, पोलीस घटनास्थळी
Ganesh Festival 2026 MSRTC : गौरी-गणपतीसाठी एसटी महामंडळाचा मेगाप्लॅन, कोकणात एसटीच्या 5,220 जादा बसेस धावणार, प्रताप सरनाईक यांची माहिती
गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, गौरी-गणपतीसाठी कोकणात एसटीच्या 5220 जादा बसेस धावणार, प्रताप सरनाईक यांची माहिती

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget