Mumbai Auto and taxi fares | मुंबईत रिक्षाच्या आणि टॅक्सीच्या दरात 3 रुपयांची भाडेवाढ
परिवहनमंत्री अनिल परब यांनी रिक्षा आणि टॅक्सी यांच्या दरात झालेल्या वाढीसंदर्भात माहिती दिली. रिक्षा, टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. रिक्षाचे भाडे 18 रुपयांवरुन 21 रुपये तर टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरुन 25 रुपये झाले आहे.
मुंबई : मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. रिक्षाचे भाडे 18 रुपयांवरुन 21 रुपये तर टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरुन 25 रुपये झाले आहे. मुंबई एमएमआर रिजनमध्ये ही भाडेवाढ लागू असेल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. 1 मार्चपासून ही भाडेवाढ लागू होईल तर 31 मेपर्यंत मीटर कॅलिबरेशन पूर्ण व्हायला पाहिजे, असंही अनिल परब यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
परिवहनमंत्री अनिल परब यांनी रिक्षा आणि टॅक्सी यांच्या दरात झालेल्या वाढीसंदर्भात माहिती दिली. तसेच त्यावेळी बोलताना खटुआ समितीच्या शिफारशीनुसार, एमएमआर रिजनमधील रिक्षा टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं सांगितलं. "रिक्षाचे दरात तीन रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता रिक्षाच्या पहिल्या टप्प्याला 18 रुपयांऐवजी 21 रुपये मोजावे लागणार आहेत. त्यापुढील प्रत्येक किलोमीटरला 14.20 पैसे मोजावे लागणार आहेत. 1 मार्च 2021 पासून ही भाडेवाढ लागू होणार आहे. तसेच टॅक्सीच्या दरात 22 रुपयांऐवजी 25 रुपये मोजावे लागणार आहेत. पहिल्या टप्प्यानंतर त्यापुढील प्रत्येक किलोमीटरला 16 रुपये मोजावे लागणार आहेत. 1 मार्च ते 31 मेपर्यंत कार्डनुसार हे भाडे आकारता येणार आहे.", अशी माहिती अनिल परब यांनी दिली.
पाहा व्हिडीओ : मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे तीन रुपयांनी वाढले
"1 मार्च ते 31 मेपर्यंत कार्डनुसार भाडं आकारता येईल. त्यानंतर 1 जूनपासून मीटरमध्ये बदल झाला पाहिजे. गेल्या 6 वर्षांपासून रिक्षा आणि टॅक्सीच्या दरा कोणत्याही प्रकारची भाडेवाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे भाडेवाढ करण्यात आली आहे.", अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.
मनसेचा अधिवेशनाशी काय संबंध? त्यांचा एकच आमदार : अनिल परब
रिक्षा आणि टॅक्सीच्या दरातील भाडेवाढीविषयी घोषणा करताना अनिल परब यांनी मनसेवरही निशाणा साधला आहे. अधिवेशनासंदर्भातील प्रश्नाबाबत बोलताना अनिल परब म्हणाले की, "मनसेचा अधिवेशनाशी काय संबंध? त्यांचा एक आमदार आहे. त्याला गैरहजर राहण्याचा अधिकार आम्ही देऊ. स्टेडियमच्या बाहेर बसणार्यांनी मैदानात कसं खेळावं हे शिकवू नये." तसेच यावेळी बोलताना अनिल परब यांनी पुन्हा एकदा राज्यपालांना आठवण करुन देत या अधिवेशनापूर्वी राज्यपाल नियुक्त आमदार नेमावेत, असं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :