एक्स्प्लोर

म्याव म्याव अंमली पदार्थ विकून रुबीनाने कमवली कोट्यावधी रुपयांची माया…

मुंबईत झोपडपट्ट्यांमधून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची विक्री होते अशी माहिती NCB ला मिळाल्यानंतर ही विक्री रोखण्यासाठी NCB ने मोठे छापे घातल्यानंतर शेख आणि सांडोळे यांची नावे समोर आली.

केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने म्हणजेच NCB ने मुंबईतील वांद्रे येथून एका महिलेला अटक केली आहे. ज्या महिलेने अंमली पदार्थ विकून कोट्यावधी रुपयांची माया जमवली आहे.  एमडी हा अंमली पदार्थ विकून तब्बल 12 कोटी रुपयांची संपत्ती गोळा केली आहे अंमली पदार्थ तरुणांमध्ये म्याऊ म्याऊ म्हणून लोकप्रिय आहे.
 
रुबिना नियाज शेख असं या अंमली पदार्थ तस्कर महिलेचे नाव असुन मालेगावमध्ये तीन बंगला, मुंब्रा येथे फ्लॅट, कुर्ला येथे दुकान, वांद्रे येथे घर आणि माहिम कॉजवे येथे दोन खोल्या आहेत. रुबिना ही अंमली पदार्थ तस्कर दुनियेतील टोळींची सेकंड-इन-कमांड आहे. NCB ने तिच्याकडून 80  लाख रुपये आणि रुपये 30 लाख किमतीचे सोने देखील जप्त केले आहे. काही महिन्यांपूर्वी रुबीना मुंबईतून पळून गेली होती. पण NCB ला त्यांच्या खब-यांकडून माहिती मिळाली की, रुबीना शेख ही गुजरातमध्ये असून ती गुजरातमधील उंझाजवळील मीरा दातार येथून अटक करण्यात आली. मात्र तिचा बॉस निलोफर सांडोले अजूनही फरार आहे.

मुंबईत झोपडपट्ट्यांमधून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची विक्री होते अशी माहिती NCB ला मिळाल्यानंतर ही विक्री रोखण्यासाठी NCB ने मोठे छापे घातल्यानंतर शेख आणि सांडोळे यांची नावे समोर आली. शेख हा केजीएन दर्गा लेन, वांद्रे येथील रहिवासी आहे. अंमली पदार्थांची तस्करी करून मिळवलेल्या पैशातून तिने तिथे घर खरेदी केले आहे. या शेखसाठी सुमारे 40 अंमली पदार्थ तस्कर काम करतात. ते मुख्यतः माहीम, वांद्रे, कुर्ला, कसाईवाडा, मुंब्रा आणि भिवंडी येथे सक्रिय आहेत, असा खुलासा तपासातून झाला आहे.

रुबीना ही गेल्या दहा वर्षांपासून व्यवसायात होती. मालेगावमधील तिझे प्रशस्त आणि आलिशान बंगल्यांची किंमत 2 कोटींपेक्षा जास्त आहे. तीन महिन्यांपूर्वी तिने कुर्ला येथे 50 लाख रुपयांना दुकान विकत घेतले होते. मुंब्रामध्ये, अमलीद नगरमधील धनश्री अपार्टमेंटमध्ये या रुबीना शेखचा फ्लॅट आहे. तिने माहिम कॉजवे येथील पांडुरंग चाळीत भाऊ, तिझी भाजी नगमा आणि तिझे सासरे यांच्या नावावर तीन खोल्याही देखील खरेदी केल्या आहेत. तर मीरा रोडमध्ये हीची काही मालमत्ता आहेत. तिच्या रिअल इस्टेटच्या मालकीची व्याप्ती किती आहे हे तपासण्याचे काम अजूनही सुरु असून समोर आलेली माहिती ही प्राथमिक चौकशीतून आलेली आहे जी अतिशय धक्कादायक आहे. 

जेव्हा त्यांनी शेखला अटक केली तेव्हा एनसीबीने तिच्याकडून रोख, सोन्याचे दागिने आणि 109 ग्रॅम म्याव म्याव हे अंमली पदार्थ जप्त केले. NCB ने या प्रकरणात आणखी दोन जणांना अटक केली आहे. रुबीना शेख आणि सांडोळेची ते राहत असलेल्या भागात इतकी दहशत आहे की, त्यांच्या परवानगी शिवाय  भागात त्यांच्या मर्जीशिवाय कोणी साधे घरे देखील विकून शकत नाही. रुबीनाचे वडील भू - माफिया असून त्यांचे चोरांचे मोठे नेटवर्क आहे. मोकळ्या भूखंडावर झोपड्या बांधायच्या आणि त्या विकायच्या हे काम ही टोळी करायची… आणि हाच मुख धंदा या टोळीचा होता पण नंतर सांडोळेला अंमली पदार्थ मिळू लागलं आणि शेखने त्यांची तस्करी करण्याची जबाबदारी घेतली.

माहीम दर्ग्याजवळ अल्पवयीन मुलांना अंमली पदार्थ विकल्याच्या प्रकरणात NCB ने सांडोळेला आरोपी बनवले आहे. तिच्या माहिम निवासस्थानावरही छापा टाकला आणि 2 लाख रोख तसच 250 ग्रॅम सोने जप्त केले आहे… सांडोळे ही सराईत अंमली पदार्थ तस्कर आहे तिला या आधी देखील मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती.   तर एनसीबीमध्ये रुबिना शेखविरुद्ध एक गुन्हा दाखल आहे. मुंबई पोलिसांकडे तीन गुन्हे दाखल आहेत. शेख गुजरातमध्ये नातेवाईकाच्या घरी गेली होती आणि तिला तिथून अटक करण्यात आली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
Embed widget