Mahashivratri 2023: शिवभक्त वर्षभर ज्या महाशिवरात्रीची वाट पाहत असतात. तो दिवस 18 फेब्रुवारी 2023 रोजी आहे. हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह उत्सव म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण देश महादेवाचा हा महान उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतो. शिवरात्रीच्या दिवशी शिवाला प्रिय गोष्टी अर्पण केल्या जातात, ज्यामुळे महादेव लवकरच प्रसन्न होतात. त्यापैकीच एक म्हणजे शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे. महादेवांना बेलपत्र अधिक प्रिय आहे. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याचे अनेक फायदे आहेत. जन्मपत्रिका विश्लेषक तसेच ज्योतिषतज्ज्ञ डॉ अनिश व्यास यांच्याकडून त्याचे फायदे जाणून घ्या



शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने काय लाभ होतो?
ज्योतिषतज्ज्ञ डॉ. अनिश व्यास यांच्या मते, भगवान शंकर यांची विविध प्रकारे पूजा केली जाते. परंतु जो भक्त शिवाची पूजा करताना त्यांना बेलपत्र अर्पण करतो, त्याला खूप लाभ होतो. जाणून घ्या सविस्तर



बेलपत्र भोलेनाथांना प्रिय आहे
धार्मिक मान्यतेनुसार, देवी पार्वतीने भगवान शंकराला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, तपश्चर्येसोबतच देवी पार्वतीने अनेक उपवासही केले. एकदा महादेव बेलाच्या झाडाखाली तपश्चर्या करत असताना देवी पार्वतीने पूजेचे साहित्य आणण्यास विसरली. यावेळी देवी पार्वतीने तेथे पडलेल्या बेलपत्राच्या पानांनी भोलेनाथाची पूजा केली. यामुळे भोलेनाथ प्रसन्न झाले आणि तेव्हापासून त्यांना बेलपत्र अर्पण करण्यात येते.



जे भक्त महाशिवरात्रीला भगवान शंकराला बेल अर्पण करतात, त्यांच्या पैशासंबंधी समस्या दूर होतात.
महाशिवरात्रीच्या दिवशी जे पती-पत्नी एकत्र भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करतात, त्यांचे वैवाहिक जीवन सुखी होते आणि त्यांना संततीसुखही मिळते.



महाशिवरात्रीला महादेवाला कोणत्या गोष्टींनी अभिषेक करतात?


-शिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथाला प्रिय गोष्टींनी अभिषेक केला जातो. जाणून घ्या कोणत्या वस्तूंनी भगवान शिवाला अभिषेक करावा?


-महाशिवरात्री उत्सवाच्या दिवशी शिव पूजेच्या वेळी शिवलिंगावर मधाचा अभिषेक करणे शुभ असते. असे केल्याने भक्ताच्या कार्य जीवनात येणार्‍या सर्व अडचणी दूर होतात आणि भगवान शंकराची कृपा राहते.


-शिवरात्रीच्या दिवशी दह्याने भगवान शंकराचा रुद्राभिषेक केल्याने आर्थिक क्षेत्रातील सर्व अडचणी दूर होतात.


-महाशिवरात्रीच्या दिवशी जे पती-पत्नी एकत्र भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करतात, त्यांचे वैवाहिक जीवन सुखी होते आणि त्यांना संततीसुखही मिळते.


-भगवान शिवाला उसाच्या रसाने अभिषेक केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते.


-भगवान शिवाला अभिषेक करताना 'ओम पार्वतीपतये नमः' या मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने जीवनात अकाळी संकट येत नाही.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


इतर बातम्या


Mahashivratri 2023: महाशिवरात्रीला राशीनुसार पूजा करा, महादेव होतील प्रसन्न! जाणून घ्या कोणता मंत्र देईल यश?