Rohit Pawar : भूकंपापूर्वी प्राणी आणि पक्षांचं वर्तन बदलत असतं… एकप्रकारे ती भूकंपाची पूर्वसूचनाच असते…असंच एक वेगळ्या प्रकारचं राज्यातील काही आमदारांबाबत माझं निरीक्षण असल्याचं सूचक ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (MLa Rohit Pawar) यांनी केलं आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक सहकारी आमदारांची कामानिमित्त मुंबईत (Mumbai) भेट झाली. त्यावेळी मला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्याचे रोहित पवारांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 


 






नेमकं रोहित पवारांनी ट्वीटमध्ये काय म्हटलंय?


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी एक सूचक ट्वीट केलं आहे. सत्ताधारी आमदारांच्या बाबतीत त्यांनी हे ट्वीट केलं आहे. "भूकंपापूर्वी प्राणी आणि पक्षांचं वर्तन बदलत असतं... एकप्रकारे ती भूकंपाची पूर्वसूचनाच असते…असंच एक वेगळ्या प्रकारचं माझं निरीक्षण आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक सहकारी आमदारांची कामानिमित्त मुंबईत असताना भेट झाली. त्यावेळी काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्याचे रोहित पवारांनी म्हटलं आहे. या आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि बॉडी लँग्वेज पडलेली होती. सत्ताधारी असूनही काही आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नसल्याचं समजलं. शिवाय अर्थ विभागातून विशिष्ट पक्षाच्याच फायली मंजूर होत असून त्याचा वेगही अचानक वाढल्याचं समजलं. ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत?" असं सूचक वक्तव्य रोहित पवारांनी ट्वीटमधून केलं आहे. 


रोहित पवारांनी ट्वीटच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षातील आमदार नाराज असल्याचं म्हटलं आहे. तसेच काही आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेट येत नाही. याचबरोबर अर्थ विभागातून विशिष्ट पक्षाच्याच फायली मंजूर होत असल्याचे रोहित पवारांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. अर्थ विभागातून विशिष्ट पक्षाच्या पाईल मंजूर होण्याचा वेग वाढला आहे. सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस हे राज्याचे अर्थमंत्री आहेत. यावरुन रोहित पवारांनी फडणवीसांकडे बोट दाखवल्याचे दिसते. दरम्यान, यासंदर्भात बोलतना रोहित पवारांनी भूकंपापूर्वी प्राणी आणि पक्षांचं वर्तन बदलत असतं… एकप्रकारे ती भूकंपाची पूर्वसूचनाच असते. त्याचप्रमाणे सत्ताधारी पक्षातील आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत? असा सवालही केला आहे. त्यामुळं त्यांच्या या ट्वीटची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Rohit Pawar : आसामच्या मुख्यमंत्र्यांचा दावा आश्चर्यकारक, सत्तेसाठी गुवाहाटीला जाणाऱ्यांनी यावर बोलावं, रोहित पवारांचा टोला