तर झालं असं की, नीता अंबानी आकाश आणि श्लोकासोबत मीडियासमोर आल्या. त्यावेळी ईशा आणि अनंतही सोबत होते. सगळ्यांचा फोटो काढल्यानंतर मीडियाला आकाश आणि श्लोकाचा सेपरेट कपल फोटो हवा होता. यासाठी प्रतिनिधी आकाश आणि श्लोकाकडे विनंती करत होते. पण नीता अंबानी काही केल्या आपल्या लेकाचा हात सोडायला कबूल नव्हत्या.
आकाश बाजूला झाल्यावर त्यांनी आपल्या सुनेचाच म्हणजे श्लोकाचा हात गच्च पकडून ठेवला. एकीकडे मीडियाचं फोटोसाठी बोलावणं आणि दुसरीकडे आईचा कपल फोटोसाठी नकार. काय करावं आकाशला काही कळेना. मग आकाशने सरळ आईचा हात बाजूला सारला आणि श्लोकासोबत कपल पोझ दिली. मीडियासमोर घडलेल्या या प्रसंगाची सध्या जोरदार चर्चा आहे.
पाहा व्हिडीओ