मुंबई : कल्याण तालुक्यातील वरपा गावात रविवारी वृक्षलागवडीच्या मोहिमेचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. राज्य सरकारने राज्यात प्लास्टिकबंदी लागू केली असताना मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमातच प्लास्टिकचे ग्लास वापरण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. कार्यक्रमात उपस्थितांना पाणी वाटण्यासाठी बंदी असलेल्या प्लास्टिकच्या ग्लासांचा वापर करण्यात आला.
राज्यात 23 जूनपासून प्लास्टिकबंदी लागू करण्यात आली आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. असे असताना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात प्लास्टिकबंदींच्या नियमांचे उल्लंघन झाले. खुद्द मुख्यमंत्र्याकडून जर प्लास्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसेल तर जनतेने काय करायचे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात प्लास्टिकचे ग्लास, प्लास्टिकबंदीचे नियम धाब्यावर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Jul 2018 01:43 PM (IST)
राज्य सरकारने राज्यात प्लास्टिकबंदी लागू केली असताना मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमातच प्लास्टिकचे ग्लास वापरण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. कार्यक्रमात पाणी वाटण्यासाठी बंदी असलेल्या प्लास्टिकच्या ग्लासांचा वापर करण्यात आला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -