एक्स्प्लोर

Sameer Wankhede : समीर वानखेडेंची बदली; केंद्रीय सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क विभागात पुन्हा नियुक्ती

Sameer Wankhede : मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची बदली करण्यात आली असून केंद्रीय सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क विभागात त्यांची बदली झाली आहे.

Sameer Wankhede : मुंबई एनसीबीचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांची बदली करण्यात आली आहे. केंद्रीय सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क विभागात समीर वानखेडे यांची पुन्हा बदली झाली आहे. मुदत संपल्यानं त्यांची एनसीबीतून बदली करण्यात आली आहे. दरम्यान, कार्यकाळ संपल्यानंतर समीर वानखेडेंना मुदतवाढ मिळावी यासाठी भाजप नेते दिल्लीत लॉबिंग करत असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता. यावेळी नवाब मलिक यांनी एक कथित ऑडिओ क्लिप (audio clip) ऐकवत समीर वानखेडेंवर (Sameer Wankhede) निशाणा साधला होता. 

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच, एनसीबीचे झोनल डायरेक्टर आयआरएस (Indian Revenue Service) अधिकारी समीर वानखेडे यांचा एनसीबीतील कार्यकाळ संपला आहे. 31 डिसेंबरनंतर त्यांना मुदत वाढ न मिळाल्यानं ते आपल्या आयआरएस केडरमध्ये परत जातील. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  आयआरएस कस्टम आणि सेंट्रल एक्साईज असं केडर असलेले वानखेडे पुन्हा आपल्या खात्याच्या सेवेत रुजु होतील. एबीपी माझानं समीर वानखेडे यांना फोनवरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी फोनकॉल स्विकारले नाहीत. 

एनसीबी अधिकाऱ्यांकडून पंचावर दबाव; मलिकांकडून कथित ऑडीओ क्लिप व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. एनसीबीकडून पंचावर दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. मलिक यांनी पत्रकार परिषदेत एनसीबीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. एनसीबी अधिकाऱ्यांकडून जुन्या पंचनाम्यावर सही करण्यासाठी पंचावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. मलिक यांनी एनसीबी अधिकारी आणि पंच यांच्या कथित संभाषणाची ऑडीओ क्लिप व्हायरल केली आहे. 

नवाब मलिक यांनी व्हायरल केलेल्या क्लिपमध्ये एनसीबी अधिकारी मॅडी नावाच्या पंचाला पंचनाम्यात बदल करुन सही करण्यासाठी सांगण्यात आल्याचा दावा केलाय. नवाब मलिकांनी म्हटले की, ''मागील काळात बनवलेल्या पंचनाम्यावर सही करण्यासाठी एनसीबीकडून पंचावर दबाव टाकण्यात येत आहे. एक मॅडी नावाचा पंच आहे. एनसीबीचा किरण बाबू नावाचा अधिकारी मॅडी नावाच्या पंचाला ऑफिसमध्ये न बोलावता ऑफिसबाहेर बोलावून पंचनामा बदलण्याबाबत बोलत आहे. तसेच अधिकारी पंचाला जुन्या पंचनाम्यावर सही करण्यासाठी दबाव टाकत आहेत.'' मलिकांनी दावा केलाय की, समीर वानखेडे देखील त्यांना सही करण्याबाबत सांगत आहेत. 

IRS चे दोन केडर कोणते?

IRS म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्विसचे दोन कॅडर आहेत. एक प्राप्तिकर म्हणजेच, Indian Revenue Service (Income Tax)  हे कॅडर मिळालेल्या आयआरएस अधिकाऱ्यांची नियुक्ती सीबीडीटी म्हणजेच, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स Central Board of Direct Taxes (CBDT) या विभागात होते. तर दुसरं कॅडर आहे, इनडायरेक्ट टॅक्स किंवा कस्टम ड्युटी. Indian Revenue Service (Custom & Indirect Taxes) हे कॅडर मिळालेल्या आयआरएस अधिकाऱ्यांची नियुक्ती सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स आणि कस्टम्स  Central Board of Indirect Taxes and Customs (CBIC) मध्ये होते. समीर वानखेडे याचं केडर हे अप्रत्यकर कर वसुलीचं म्हणजे, आयआरएस इनडायरेक्ट टॅक्सेस आणि कस्टम्स असं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Embed widget