मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभागातील सेंट्रल आणि हार्बर लाईनवर 12 डिसेंबरला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
मुलुंड-दिवा अप आणि दिवा धीम्या मार्गावर सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत
दादर येथून सकाळी 10.11 ते दुपारी 03.14 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि दिवा स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कळवा आणि मुंब्रा स्थानकांवर न थांबता दिवा स्थानकावर डाऊन धिम्या मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.
कल्याण येथून सकाळी 10.27 ते दुपारी 3.37 या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा दिवा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या सेवा मुंब्रा आणि कळवा स्थानकांवरील थांब्यांवर न थांबता पुढे मुलुंड स्थानकात अप धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.
पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत (बेलापूर-खारकोपर सेवा प्रभावित नाही; नेरुळ-खारकोपर सेवा रद्द)
पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकरीता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.16 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाण्याकरीता सुटणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेलकरीता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
नेरूळ येथून सकाळी 11.40 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत खारकोपरसाठी सुटणारी डाउन मार्गावरील सेवा आणि खारकोपर येथून सकाळी 12.25 ते सायंकाळी 4.25 वाजेपर्यंत नेरूळकरीता सुटणारी अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत बेलापूर आणि खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागावर विशेष उपनगरीय गाड्या चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.
पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक असून प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या :