मुंबई : मुंबई लोकल (Mumbai Local)  ही मुंबई आणि आसपासच्या  शहरांमधील प्रवाशांची लाईफ लाईन मानली जाते. त्यामुळेच लोकलच्या तिकिटांचे दर कमी-जास्त झाल्यास त्याचा राजकारणावर देखील परिणाम होतो. त्यामुळेच कदाचित मुंबईत सुरु झालेल्या एसी लोकलचे दर कमी करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. 


काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक  कार्यक्रम पार पडला. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये एसी लोकलची लोकप्रियता वाढवण्यासाठी तिचे तिकीट दर कमी करावे अशी सूचना करण्यात आली. त्यानंतर या संदर्भातला प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवून त्यावर विचार सुरू असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले आहे. सोबतच प्रथम श्रेणीच्या तिकीट दरांमध्ये काटछाट करता येईल का, या संदर्भात विचार सुरू असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. मात्र या दोन्ही संदर्भात अधिकृत माहिती देण्यास मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि एम आर व्ही सी च्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. 


तिकीट दर कमी करण्याचे प्रस्ताव नेमके कोणत्या रेल्वेने पाठवले याबद्दल देखील सध्या कोणीही बोलण्यास तयार नाही. मात्र भाजपच्या मुंबईतील नेत्यांकडून यासंदर्भात दबाव असल्याचे दिसून येत आहे. सहाजिकच येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तिकीट दर कमी झाल्यास त्याचे मतांमध्ये रूपांतर होईल अशी शक्यता आहे. तसेच केंद्रात भाजपचे सरकार असल्यामुळे निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळी या गोष्टीचे श्रेय देखील लाटता येईल. त्यामुळेच तिकीट दर कमी करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र यासंदर्भात अधिकृतरितपणे  बोलण्यास कोणीही तयार नाही.


दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून वाढवण्यात आलेले प्लॅटफॉर्म तिकीटांचे दर पूर्ववत करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुंबई रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीटांच्या दरात मोठी वाढ करण्यात आली होती. याशिवाय रेल्वे प्लॅटफॉर्मवर विमानास्क फिरणाऱ्या नागिरकांकडून 500 रुपयांचा दंडही वसूल केला जात होता. दरम्यान, मुंबईतील कोरोबाधितांच्या संख्येत घट होऊ लागल्यानं टप्प्याटप्प्यानं कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत.


 मुंबईत लोकलचं तिकीट लवकरच मोबाईलवर मिळणार



संबंधित बातम्या :


Platform Ticket: कोरोना काळात वाढवण्यात आलेले प्लॅटफॉर्म तिकीट दर पूर्ववत, मध्य रेल्वेची माहिती


Mumbai Local Train : युटीएस मोबाईल अ‍ॅप आणि युनिव्हर्सल पास लिंक; कटकट संपणार, ऑनलाईन तिकीट, पास मिळणार


Mumbai Local Trains : लोकल प्रवाशांसाठी खुशखबर; लसीचे दोन डोस घेतलेल्यांना तिकीट मिळवणं आणखी सोपं