मुंबई : मुंबईकरांना आज दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईत आज दुसऱ्यांदा एकही कोरोना रुग्णांच्या (Coronvirus)  मृत्यूची नोंद झालेली नाही. याअगोदर 17 ऑक्टोबरला पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झालेली होती. त्यानंतर आज शून्य रुग्णांची नोंद झालेली आहे. 


मुंबईत आज 256 रुग्णांची भर 


मुंबई महानगरपालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मुंबईत 256 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे तर 221 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत आतापर्यंत 07 लाख 44 हजार 370 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के आहे. मुंबईचा कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 2940 दिवस झालाय. मुंबईत सध्या 1 हजार 808 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत आज 44,380 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. तर, मुंबईत आजपर्यंत एकूण 1 कोटी 28 लाख 45 हजार 686 नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत आज हाय रिस्क देशातून 6042 प्रवासी आले आहे. त्यापैकी 29 प्रवासी कोरोनाबाधित आढळले आहे. सध्या मुंबईत ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या पाच आहे. 


राज्यात शनिवारी 807 नवीन कोरोनाबाधितांची नोंद


राज्यात आज  807 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 869  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 91  हजार 805 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के आहे.  राज्यात आज 20 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 6 हजार 452 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 75 हजार 095 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 865 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 67 , 59, 668 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या: